Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याचे ४००० रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. पण यामागचे सत्य काय आहे ते घ्या जाणून...
Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
  • पीएम किसानच्या २४ व्या हप्त्यात ४ हजार रुपये मिळणार

  • पीएम किसानचा हप्ता २ हजारांवरून ४ हजार होणार

  • पीएम किसान योजनेबाबत व्हायरल होतोय मेसेज

  • व्हायरल होणारा मेसेज हा खोटा असल्याचे सत्य आले समोर

सध्या पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. 24 वा हप्ता हा 4 हजार येणार असल्याचा दावा केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत आता दुप्पट रक्कम मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. 4 हजारांचा हप्ता वितरित झाल्याचा दावा करण्यात आलाय. आधी जिथे 2 हजार रुपये मिळत होते..तिथे 4 हजार मिळणार असल्याचा दावा केलाय. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. मात्र, आता हा मेसेज व्हायरल होत असून, 24 वा हप्ता हा 4 हजार रुपयांचा आल्याचा दावा केलाय. पण, खरंच शेतकऱ्यांचा हप्ता वाढवण्यात आलाय का? हा विषय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पैसे देण्याच्या नावाने फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?
PM Kisan Installment : शेतकर्‍यांच्या खात्यात ₹2,000 येणार की ₹4,000? पीएम किसानच्या हप्त्याची अपडेट समोर

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यासाठी प्रत्येकी 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बँक खातं तपासून पाहिलं. पण, अनेकांना असा कोणताही मेसेज आल्याचं आढळून आलं नाही. सरकारने खरंच अशी घोषणा केलीय का? हप्ता न आल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आमच्या टीमने सरकारकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

24 व्या हप्त्यासाठी 4 हजार रुपये मिळाल्याच्या अफवा आहेत. PM किसान योजनेअंतर्गत प्रत्येक हप्ता 2 हजारच मिळतो. 4 हजारांचा हप्ता मिळत असल्याचा दावा खोटा आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार मिळतात. त्यामुळे पीएम किसान योजनेबद्दलची खरी माहिती फक्त पीएम किसान योजना पोर्टलवरच मिळू शकते. या योजनेच्या https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊ शकता.

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००?

या चालू वर्षात आतापर्यंत 2 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. पहिला हप्ता 13 मार्च रोजी, तर दुसरा 20 जून रोजी वितरित करण्यात आला. या चालू वर्षाचा अंतिम हप्ता ऑक्टोबरमध्ये वितरित होण्याची शक्यताय. पण, यावेळेचा हप्ता हा 4 हजार रुपये वितरित झाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातायत...मात्र, अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये येऊ शकतात २००० रुपये; ही एक चूक केली तर पैसे अडकणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com