Sambhal Temple: शिवलिंग, हनुमानाची मूर्ती अन् विहीर; संभळमध्ये ४६ वर्षांनंतर मंदिर खुलं |Video

Sambhal Temple Opened: उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात असलेल्या खग्गुसरायमध्ये ४६ वर्षानंतर मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. या मंदिरात शिवलिंग, हनुमानाची मूर्ती मिळून आलीय.
Sambhal Temple
Sambhal Temple Opened:Live Hindustan
Published On

उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील खग्गुसरायमध्ये ४६ वर्षांनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. विज चोरी पकडण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकाकडून येथे शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यादरम्यान येथे बंद पडलेलं मंदिर आढळून आलं. प्रशासनाकडून मंदिर उघडण्यात आलंय. त्यानंतर परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेली तेथे एक विहिरही आढळून आलीय. त्यानंतर विहिरीची साफसफाई करण्यात आली.

दरम्यान हे मंदिर रस्तोगी कुटुंबाच्या कुलगुरूचं सांगितलं जात आहे. दरम्यान येथील लोकांना दावा केला की, येथील काही मंदिरांवरही येथील लोकांनी ताबा घेतला होता. या मंदिराबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी माहिती दिलीय. आज सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली. याचवेळी विजेची चोरी होत असल्याची माहिती समोर आली. याचा तपास करण्यासाठी जिल्हा अधिकारी पोलीस यंत्रणेसह तेथे गेले होते. त्यावेळी तेथे मंदिर बंद असल्याचं समोर आलंय.

Sambhal Temple
Sambhal News: राहुल गांधींना संभलला जाण्यापासून रोखलं; सरकारला सुनावलं, Video

त्यानंतर प्रशासनाकडून या परिसराची तपासणी करण्यात आली मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. मंदिराची आणि तेथील परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच जेसीबीच्या साहाय्याने येथे खोदकाम करण्यात आलीय. तेव्हा येथे विहीर आढळलीय. मंदिरावर कब्जा करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. या परिसरातील हिंदू समाजाचे लोक तेथून निघून गेले आहेत. अनेकवर्षांपासून येथील मंदिर बंद होतं. दरम्यान आज प्रशासनाकडून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आली आहेत.

Sambhal Temple
ना शिर्डी- ना तिरूपती, 'या' मंदिरात २५ कोटींहून अधिक रूपयांचं दान, अडीच किलो सोनं आणि..

येथील लोकांच्या विनंतीनंतर प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले, त्यावेळी येथे विहीर आढळून आली. त्यानंतर प्रशासनाने येथील परिसराची सफाई केली. साफसफाई झाल्यानंतर येथील नागरिकांनी देवांच्या मूर्तींची पूजा केली. दरम्यान जिल्हाधिकारी आता या धार्मिक आणि ऐतिहासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरी आणि तीर्थस्थळांचा परिसर सुशोभित करणार आहेत.

या स्थळांना पूर्वीच्या स्थितीत आणण्यासाठी अनेक ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएमला पालिकेकडून साफसफाई करण्याचे आदेश दिलेत. जेणेकरून परिस्थिती स्पष्ट होईल. यानंतर जमिनीच्या मालकीचीही चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com