Sambhal News: राहुल गांधींना संभलला जाण्यापासून रोखलं; सरकारला सुनावलं, Video

Sambhal Masjid Controversy: काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर खासदार संभलाला जात होते. मात्र त्यांना गाझीपूरच्या सीमेवरच रोखण्यात आलंय. त्यानंतर राहुल गांधींनी सरकारला खडेबोल सुनावले आहे.
Rahul Gandhi
Published On

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संभलला जात होते. मात्र त्यांच्या ताफ्याला गाझीपूरच्या सीमेवरील फ्लायओव्हर जवळ रोखण्यात आलंय. राहुल गांधींना सीमेवरच रोखण्यात आल्यामुळे काँग्रेस नेते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते तेथेच आंदोलन करू लागले, परंतु पोलिसांना त्यांन तेथून हुसकावून लावलं.

राहुल गांधी यांनी संभलला जाण्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी 4 जणांना पुढे जाण्याची परवानगी मागितली, मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही. यानंतर राहुल गांधींनी फक्त एकट्याला संभल येथे जाऊ द्यावे अशी विनंती केली. परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची ती विनंतीही अमान्य केली. पोलिसांनी संभलला जाण्यास परवानगी न दिल्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दिल्लीला माघारी गेले. आता ते ६ डिसेंबरनंतर ते केव्हाही संभलला भेट देऊ शकतात, असे सांगण्यात आले.

Rahul Gandhi
Sambhal Jama Masjid Survey : उच्च न्यायालयात आधी सुनावणी होऊ द्या, SC च्या संभल कोर्टाला सूचना

मात्र काँग्रेसने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. दिल्लीला परतल्यानंतर राहुल गांधींना सरकारवर टीकास्त्र डागलंय. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा अधिकार असूनही मला संभलला जाण्यास परवानगी देण्यात येत नसल्याचं राहुल गांधी म्हणालेत. मला एकट्याला तरी जाऊ द्या, अशी विनंती केली परंतु पोलिसांनी तेही मान्य केली नसल्याचं ते म्हणालेत.

हे विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराविरुद्ध असून त्यांनी मला जाऊ द्यावे. हे संविधानाच्या विरोधात आहे. आम्हाला लोकांना भेटायचे आहे आणि तिथे काय झाले ते पाहायचंय. मला माझे घटनात्मक अधिकार दिले जात नाहीत. हा नवा भारत आहे, हाच भारत संविधान नष्ट करणारा आहे, आम्ही लढत राहू असं राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com