Viral Video: ''सोडा सोडा राया'' वर आजीबाईंचा झकास डान्स; व्हिडिओला मिळतीये लाखोंची दाद

Viral Dance Video: सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ व्हायरल होणे साधारण गोष्ट आहे. पण त्यात डान्स करणारी आजीं असेल तर. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका आजींचा आहे जो तुफान व्हायरल होतोय.
Viral Dance Vide
Viral VideoSaam Tv
Published On

Elderly Woman Dancing: सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये बऱ्याचजा काही क्षण असे असतात, जे लोकांच्या मनाला भावतात आणि चेहऱ्यावर एक सुंदर हास्य फुलवतात. नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आजीबाईंनी ‘सोडा सोडा राया हा नाद खुळा’ या गाण्यावर नादखुळा डान्स केला आहे.

वय फक्त एक आकडा!

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आजीबाईंचं वय साधारण सत्तरच्या आसपास असावं. पण त्यांचा उत्साह आणि डान्स (Dance) पाहता हे सांगणं कठीण होईल. गाणं सुरु होताच आजी काही तरुणीसोबत डान्स करण्यात रंगून जातात. आजींच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि कमाल स्टेप्स पाहून प्रत्येकणाच्या पसंतीस आजींचा डान्स आलेला आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने कमेंट केली,''नाद खुळा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आजीबाई वरात पाहून डान्स शिकल्या वाटते.नागीण डान्स करतात'' शिवाय अजून एका यूजरने कमेंट केली,''आजी खुप डेंजर डान्स करती राव'' अशा प्रकारे अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

आजींचा (Old Women) हा डान्स व्हिडिओ marathi_status या अकाउंटवर अपलाजो करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. पण काही तासांतच लाखो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत आणि हा व्हिडिओला ट्वीटर, फेसबूक या सारख्या अन्स सोशल मीडिया माध्यंमावरही शेअर करण्यात आलेला आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Dance Vide
Viral Video: ''ढगाला लागली कळ'' गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकायला लागाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com