Viral Video: ''ढगाला लागली कळ'' गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकायला लागाल

Viral Marathi New: सोशल मीडियावर सध्या एका लग्नाच्या वरातीमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका काकांचा आहे,ज्यांनी सर्व वरातीत असा डान्स केला जो सर्वजण पाहतच राहिले.
Viral Marathi New
Viral VideoSaam Tv
Published On

Funny Dance Video: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ''ढगाला लागली कळ पाणी'' या लोकप्रिय गाण्यावर एका काकांनी केलेला धमाल डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. त्यांच्या अविस्मरणीय अदा, आणि बेधुंद नृत्यशैलीमुळे हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने ट्रेंड होत आहे.

काकांचा धमाल व्हिडिओ पाहिलात का?

या व्हिडीओमध्ये (Video) एका लग्नाच्या वरातीत ''ढगाला लागली कळ पाणी'' या गाण्यावर थिरकताना दिसत अजून त्यांना गावाकडचा पारंपरिक कपडे परिधान केलेले आहेतय डान्स करत असताना त्यांच्या हालचाली आणि हावभाव इतके जबरदस्त आहेत की, पाहणारा प्रत्येकजण पोट धरुन हसत आहे.

व्हिडीओला मिळतोय प्रचंड प्रतिसाद

काकांचा डान्स (Dance) व्हिडिओ सध्या rohit_lambe_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर तो फेसबुक, यूट्युब आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवही तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट होताच काही तासांतच हजारो व्ह्यूज आणि लाईक्स शिवाय अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की,''काकांचा नाद खुळा राव'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जे आवडतं त्याची मजा घेतात आली पाहिजे तरच आयुष्यात मजा आहे'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''काकाची बायको नक्की माहेराला गेली वाटतय'' अशा प्रकारे काहींनी डान्सचे कौतुक तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Marathi New
Viral Video: “बाया भुकल्यान गो…”, मराठी गाण्यावर तरुणींचा ठसकेबाज ठुमका; व्हिडिओ पाहून नेटकरी फिदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com