
Elderly Woman Dancing: सोशल मीडियाच्या युगात आजी-आजोबांनाही आपली कला दाखवून प्रसिद्धी मिळवण्याचं उत्तम व्यासपीठ हे मिळालं आहे. चिमुकल्या मुलांपासून ते वयोरुद्ध व्यक्तीही सोशल मीडियाचा आता मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सध्या नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये एका आजींनी नवदच्या दशकातील एका प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. डान्स पाहिल्यानंतर नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत.
व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओतील आजींचे वय साधारण ७० वर्षांच्या आसपास दिसत असून डान्स करण्यासाठी त्या उभ्या आहेत. पारंपरिक साडी नसलेली असून डोक्यावर पदरही घेतलेला आहे. त्यानंतर आजी घरात असलेल्या कुटुंबियांसमोर गुपचुप गुपचुप या हिट गाण्यावर डान्स करत आहेत. डान्स करताना चेहऱ्यावर मनमोकळं हास्य आणि आत्मविश्वास दिसत असून या व्हिडिओचे मुख्य आकर्षण हे आहे.
हा व्हिडिओ काही तासातच तुफान व्हायरल झालेला आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 90s_song या अकाउंटवर अपलोड केला आहे. आतापर्यंत या डान्स व्हिडिओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शिवाय यावर हजारोंच्या संख्येने कमेंट्स आल्या आहेत ज्या पूर्णपणे सकारात्मक आहेत.
आजींचा डान्स (Dance) पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले तर बऱ्याच लोकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आजी रॉक बाकी शॉक'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''या वयातही कमाल उत्साह'' शिवाय अजून एका यूजरने कमेंट केली,''कमाल आहे'' अशा भरभरुन नेटकऱ्यांनी आजींचे कौतुक केलेले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.