Old Man Dance Viral Video: चक धूम धूम... गाण्यावर आजोबांचा नादखुळा डान्स; हिरोलाही लाजवेल अशा केल्या स्टेप्स VIDEO व्हायरल

Old Man Dance On Chak Dhoom Dhoom Song: बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित या दोघांनी या गाण्यात डान्स केलाय.
Old Man Dance Viral Video
Old Man Dance Viral VideoSaam TV
Published On

Grand Father Dance Life shah Rukh Khan: सोशल मीडियावर नेहमीच डान्सचे अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ चकित करणारे असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात. तसेच काही व्हिडिओपाहून आपल्याला पोट दुखेपर्यंत हसू येतं. अशात सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ चर्चेत आलाय. यामध्ये एका आजोबांचा डान्स पाहून सारेच थक्क झालेत. (Old Man Dance On Chak Dhoom Dhoom Song)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आजोबा बॉलिवूडमधील चक धूम धूम या गाण्यावर डान्स करतायत. बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित या दोघांनी या गाण्यात डान्स केलाय. मात्र व्हिडिओमध्ये आजोबा शाहरुखलाही टक्कर देताना दिसतायत.

Old Man Dance Viral Video
BJP Mla Audio Clip Viral : तुझ्या एका मताने निवडून येतो का? प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला भाजप आमदाराने खडसावलं;ऑडियो क्लिप व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी काही वृद्ध मंडळी जमली आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करताना ते दिसतायत. अशात त्यातील एक आजोबा चक धूम धूम गाण्यावर नाचत आहेत. गाण्याचे सर्व बोल त्यांना पाठ असून त्यांनी या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. त्यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. नेटकरी यावर विविध कमेंट करतायत.

काहींनी यावर कमेंट करत म्हटलंय की, आजोबांनी तरुणांना लाजवेल असा डान्स केला. तर आणखीन एका युजरने आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहत कमेंटमध्ये लिहिलं आहे की, असं आयुष्य जगा की दु:ख कधी तुमच्या जवळ येणार नाही. तर आणखीन एकाने लिहिलंय की, जिंदगी जिंदाबाद; जो जिया वही सिकंदर.

Old Man Dance Viral Video
Kirit Somaiya Viral Video Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार?; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंचं पीडित महिलेला आवाहन

या व्हिडिओला (Video) आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लाइक्स आलेत. विजय खरोटे असं या आजोबांचे नाव आहे. ते एक व्हिडिओ क्रिएटर आहेत. आजोबा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांचे इंस्टाग्राम पेज चाळले असता. त्यावर त्यांच्या अनेक मजेशीर रील व्हिडिओ पाहायला मिळतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com