BJP Mla Audio Clip Viral : तुझ्या एका मताने निवडून येतो का? प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला भाजप आमदाराने खडसावलं;ऑडियो क्लिप व्हायरल

Political news : व्हायरल ऑडियो क्लिपनंतर आदिवासी युवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Mla Devrao Holi
Mla Devrao Holi Saam TV
Published On

मंगेश भांडेकर

Gadchiroli News : 'तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदार संघातून निवडून येता, मग आदिवासींची बाजू का घेत नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या एका युवकाला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी चुकीच्या पद्धतीने खडसावलं आहे.

तुझ्या एका मताने मी निवडून येतो का, असं म्हणत त्यांनी त्यांच्या मतदारसंघातीन एका युवकाला फटकारलं आहे. सोशल मीडियावर या दोघांमधील संवादाची 'ऑडिओ क्लिप' व्हायरल झाली आहे. या व्हायरल ऑडियो क्लिपनंतर आदिवासी युवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात तलाठी आणि वनरक्षक भरतीमध्ये पेसा अंतर्गत सर्वाधिक जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. त्यामुळे ओबीसींमध्ये रोष आहे. या भरतीत ओबीसींना बरोबरीने स्थान देण्यात यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.  (Latest Political News)

Mla Devrao Holi
Uddhav Thackeray meet Ajit Pawar : अजित पवारांचं कौतुक अन् शिंदे-फडणवीसांवर निशाणा, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...

आमदार डॉ. देवराव होळी यांनी विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित करत पदभरती रद्द करा अशी मागणी केली. याविषयी जाब विचारण्यासाठी एका युवकाने आमदार होळी यांना फोन करून तुम्ही आदिवासींचे नेतृत्व करता मग त्यांची बाजू का मांडत नाही. पदभरतीत इतर समाजाच्या जागा वाढवून देण्याची मागणी करण्याऐवजी भरतीच रद्द करा, अशा प्रकरची मागणी का केली, याबद्दल विचारणा केली आहे.  (Tajya Marathi Batmya)

Mla Devrao Holi
Maharashtra Monsoon Session Updates: 'वंदे मातरम्'वरून विधानसभेत गदारोळ, अबु आझमींच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर

दोघांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा संदर्भात देखील संभाषण झाले आहे. परंतु आमदार होळी यांनी तुझ्या एका मताने निवडून आलो काय, असं युवकाला सुनावलं. या ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याबद्दल आमदार होळी यांना विचारणा केली असता, त्यांनी आपला सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न असून कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही असे सांगून विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने ही 'क्लिप' व्हायरल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com