Viral Video: जावयाचा बायकोसोबत लग्नात डान्स; सासऱ्यांनीही रंगात येत धरला ठेका

Viral Dance Video: सोशल मीडियावर कायम अतरंगी असे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा हटके आहे. नेमके व्हिडिओत काय ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.
Viral Dance Video
Viral VideoSaam Tv
Published On

Wedding Viral Video: लग्न म्हटलं की घरातील कुटुंबियांमध्ये आनंद, जल्लोष, आणि नाचगाणी असे वातावरण. सध्या सोशल मीडियावर एक धमाल व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जावई आपल्या बायकोसह लग्नात स्टेजवर धम्माल डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे, या डान्समध्ये त्यांचे सासरेही सामील झाले असून, सर्वांनी मिळून उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केलं.

या व्हायरल(VIRAL) व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की, नवरदेव, नवरी आणि नवरीचे वडील डान्स करत असतात. त्यानंतर एक गाणं वाजण्यास सुरु होते. मग काय नवरदेवाने गाण्यावर ठेका धरत डान्स करण्यास सुरुवात केली. नवरदेव एकटा न नाचता त्याने बायकोच्या वडिलांसोबत डान्स करु लागला. नवरदेवाच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद हा काही वेगळाच आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मग काय, तिघांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून उपस्थित पाहुणेही थक्क होतात. काहीजण टाळ्या देतात, तर काहीजण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतात.

हा व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील jitendra_jadaun या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ फक्त त्या शहरापूर्ती मर्यादित न राहता, प्रत्येकाच्या पसंतील आलेला आहे. १ लाखांहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज याला मिळालेले आहेत.

अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत की,"फॅमिली गोल्स म्हणतात ते हेच" तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''वडिल नशिबवान आहेत असा जावई मिळाला'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''ताईच्या संसाराला नजर नको लागालया'' अजून एका यूजरने कमेंट केली,''खुप सुंदर व्हिडिओ आहे'' अशा प्रकारे कौतुकास्पदच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Dance Video
Viral Dance Video: हळदीच्या सोहळ्यात बाप-लेकीचा धमाका; मराठी गाण्यावर केला जबरदस्त डान्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com