Viral Video: शाब्बास गड्या! चोरट्यांना फसवण्यासाठी वापरली भन्नाट आयडिया; पाहा VIDEO

Viral Jugad Video: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात त्याने घरात चोरी टाळण्यासाठी जुगाड केला आहे तो सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.तुम्हीही तो व्हिडिओ एकदा पाहा.
Viral Jugad Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral News Video: जगभरात दर एक मिनिटांला चोरीच्या अनेक घटना घडत असतात.सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा असे व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात.अनेकदा चोरीच्या घटनांमुळे घरातील सदस्य अनेक सावधिरीची साधने जवळ बाळगतात आणि घराभोवती सुरक्षितता वाढवतात.मात्र सध्या एका व्यक्तीने असा काही जुगाड केला आहे,जो तुम्हीही केला तर तुम्हाला नक्की चोर घरात आल्यानंतर समजेल.

सोशल मीडिया हा एकमेव असे माध्यम आहे,ज्या मार्फत जगभरातील भन्नाट किस्से पाहण्यासाठी मिळतात.अनेकदा काही व्यक्तींचे व्हिडिओ असतात,ज्यात ते काम सोपे करण्यासाठी हटके जुगाड (Jugad)करतात.देसी जुगाडचे व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी हैराण तर होतो किंवा आश्चर्यात तरी पडतो,सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे.जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहिले तर,तुम्हाला घरातील आतील बाजू दिसत आहे.ज्यात एक व्यक्ती आहे.जो घरातील आतील बाजूस आहे आणि बंद दरवाजाच्या मागे उभा आहे.काही वेळाने तो एक स्टीलचे ताट आणतो आणि दरवाजाच्या अगदी बाजूला असलेल्या खिळ्याला अडकवतो.तुम्ही पाहिले तर अडकवलेले स्टीलचे ताट आर्धे दरवाजाच्यामध्ये येते आणि जर दरवाजा कोणीही बाहेरुन उघडण्याचा प्रयत्न करेल तर ताट सरल खाली पडून जोरदार आवाज येईल.

5x_rohit या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ(Video) अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ कुठल्या शहरातील व्यक्तीने केलेला आहे हे समजले नाही मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.नेटकरी वर्गातूनही अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''अरे चोर काय दरवेळी दारातून येणार आहे का?''तर अनेकांनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Jugad Video
Deshi Jugad : तरुण शेतकऱ्याचा जुगाड; टाकाऊ वस्तूंपासून बनवले शेतीपयोगी मिनी ट्रॅक्टर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com