Deshi Jugad : तरुण शेतकऱ्याचा जुगाड; टाकाऊ वस्तूंपासून बनवले शेतीपयोगी मिनी ट्रॅक्टर

Nashik News : येवला तालूक्यातील हडप सावरगाव येथील प्रविण कोल्हे या तरुण शेतकऱ्याने टाकावू वस्तू पासून मिनी ट्रॅक्टर म्हणजे छोटा पावर ट्रिलर बनवला
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : शेती व्यवसाय सध्या जिकरीचा झाला आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करत शेती व्यवसाय करावा लागत आहे. अशाच एका तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्र्क्टर म्हणजे पावर टिलर मशिन बनविले आहे. 

Nashik News
Kolhapur Heavy Rain : मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान, घरांची पडझड; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरवात


शेती करतांना शेतकऱ्यांना (Farmer) अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यात त्याच्या मालाला भाव मिळेल याची शाश्वती नसते. कमी खर्चात लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र काहीजण वेगवेगळे प्रयोग करून नवीन असे काही करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच प्रकारे (Nashik) नाशिकच्या येवला तालूक्यातील हडप सावरगाव येथील प्रविण कोल्हे या तरुण शेतकऱ्याने टाकावू वस्तू पासून मिनी ट्रॅक्टर म्हणजे छोटा पावर ट्रिलर बनवला आहे. 

Nashik News
Dhadgaon Rain : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर धडगाव शहरात पुन्हा पाऊस; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

घरी जून्या पडलेल्या वस्तू (deshi Jugad) जमा करत त्याने अवघ्या २ हजार रुपयात हा मिनी पावर ट्रिलर बनवला आहे. यातून शेतीची कोळपणी, नांगरणी, सरी पाडणे अशा विविध काम केली जातात. हे सर्व करतांना वडिल शशिकांत कोल्हे यांचे मार्गदर्शन घेतले आणि एक आगळेवेगळ हाताने चालवणारे मिनी ट्रॅक्टर जणू स्वतःच्या कल्पनेतून साकार झाले. त्याचा फायदा शेतीसाठी करता येत आहे. एकुणच शेतीसाठी काम करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करत तरुण शेतकऱ्याने केलेला टिकाऊ मिनी ट्रॅकरचा गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com