Kolhapur Heavy Rain : मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान, घरांची पडझड; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरवात

Kolhapur news : कोल्हापूर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Kolhapur Heavy Rain
Kolhapur Heavy RainSaam tv
Published On

रणजित माजगावकर 
कोल्हापूर
: कोल्हापूर जिल्ह्यात गेली १५ दिवस मुसळधार पाऊस झाला. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरायला सुरुवात झाली होती. मात्र गेली ४ दिवस पावसाने उसंत दिल्यानंतर पुराचे पाणी आता हळूहळू ओसरत आहे. यानंतर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे.

Kolhapur Heavy Rain
Snake Bite : शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना सर्पदंश; दोघांची प्रकृती गंभीर

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे घरांची देखील पडझड झाली असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. नदी काठी असलेली पिक गेली अनेक दिवस पाण्यापमध्ये राहिल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय (Heavy Rain) मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

Kolhapur Heavy Rain
Nandurbar News : नंदुरबार- नवापूर दरम्यान महामार्गावरील वाहतूक ९ दिवस बंद; रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामामुळे गेट बंद

त्यानूसार आता पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने हे पंचनामे करण्यात येत आहेत. तर शहरी भागामध्ये महापालिकेचे कर्मचारी पंचनामे करत आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई करिता त्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे; अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com