
Viral Dance Video: 90’s च्या सुपरहिट गाण्यावर आजीबाईंनी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्साहाने भरलेला त्यांचा परफॉर्मन्स पाहून लोक थक्क झाले आहेत. आनंद, आत्मविश्वास आणि स्टाईल यांनी भरलेला हा व्हिडीओ लाखोंच्या मनाला भिडतोय आणि प्रेरणादायी ठरत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक वयोवृद्ध आजींनी (Old Women) सुट पायजमा घातलेला दिसत आहे. घरात कार्यक्रम असल्याने घराच्या बाहेर मांडव घातलेला असून त्याचेवळी गाणं सुरु होत आणि आजी सहजपणे त्यावर ताल धरतात. अवघ्या काही क्षणात आजींचा डान्स इतका रंगात येतो की, मांडवातील डान्स पाहतच राहतात. आजींच्या चेहऱ्यावरचा आनंदर शिवाय आत्मविश्वास नेटकऱ्यांच्या पंसतील पडलेलं आहे.
सध्या हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा अनेक प्लॅटफॉर्मवर फिरत असून, त्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. "आजीकडून प्रेरणा घ्यायला हवी", "तुमचा डान्स दिवस उजळवून गेला", "हा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे" अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
आजींची या व्हिडिओमुळे(Video) बऱ्याचजणांनी आपल्या आई-वडिलांना शिवाय आजी-आजोबांना डान्स करायला प्रोत्साहित केलं आहे. काहींनी त्यांच्या व्हिडिओजदेखील शेअर केले आहेत. सोशल मीडियाच्या या युगात अशा सकारात्मक कंटेंटला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.