Viral Dance Video: लग्नात नवरदेवाचा धमाल परफॉर्मन्स, नवरी पाहतच राहिली; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण अनेक माध्यमांवरही शेअर करत आहेत. नक्की काय घडले ते एकदा पाहा.
Viral Video
Viral Dance VideoSaam Tv
Published On

Groom Dance Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास क्षण असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नासाठी स्वप्नं पाहतो, तयारीही करतो आणि या दिवशी स्वतःला खास आणि आनंदी वाटावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण काही वेळा या आनंदात इतकी भर पडते की एखादी गोष्ट विशेष ठरते आणि सगळ्यांच्या लक्षात राहते. असाच एक प्रसंग नुकत्याच झालेल्या एका लग्नात पाहायला मिळाला, जेथे नवरदेवाच्या आनंदाने सगळं लग्नमंडप हसत राहिलं

लग्नात (Weeding)आलेल्या पाहुण्यांचे लक्ष नवरीकडे असतं. तिची साडी, दागिने, चालण्याची ढब, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही पाहण्यात पाहुणे रमलेले असतात. पण सध्याच्या व्हायरल होत असलेल्या लग्नात सगळं चित्रच वेगळं होतं. कारण नवरदेवच इतका उत्साही आणि आनंदी होता की त्याने सगळ्यांच्या नजरा स्वतःकडे खेचल्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता, लग्नमंडपात वाजतगाजत नवरदेवाची मिरवणूक सुरू होते आणि डीजेच्या तालावर तो नाचायला लागला. सुरूवातीला सर्वांनी विचार केला की काही वेळ नाचून तो थांबेल, पण उलट नवरदेवाचा जोश वाढतच गेला. त्याचे मित्र, नातेवाईक आणि अगदी वऱ्हाडातले लहान-मोठे सगळे त्याच्या जोडीने नाचू लागले, पण तरीही त्याची एनर्जी सगळ्यांपेक्षा वेगळी होती.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील besarcasmic या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओमधील नवरदेवाचा डान्स(Dance) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रचंड आवडलेला आहे शिवाय अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की,''लग्न जमवण्यासाठी पठ्ठ्याला लय मेहनत लागली दिसत आहे'' तर

टीप: हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Dance Viral Video: गोविंदाच्या गाण्यावर नवविवाहित जोडप्याचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com