

आजकाल आपला एकही दिवस असा जात नाही जेव्हा आपण सोशल मीडियावर स्क्रोल करत नाही. दररोज कामानंतर, झोपण्यापूर्वी किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण फोन हातात घेतो आणि थेट सोशल मीडियावर रील्स पाहतो. यापैकी अनेक व्हिडीओ हे इतके गमतीशीर असतात की आपल्याला हसू रोखत नाही.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही हसू आवरणार नाहीये. हा व्हिडीओ नेमका काय आहे ते पाहूयात.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला तिकीट नसल्यामुळे टीसीने पकडलंय. जर तुम्ही तिकीटाशिवाय प्रवास करत असाल आणि तुम्ही पकडले गेलात, तर तुमच्या मनात पहिला विचार कोणता येतो? अनेकदा आपल्या मनात पळून जावं असाच विचार येतो. या व्यक्तीनेही तोच विचार केला आणि तो थेट पळून गेला.
टीसीने या व्यक्तीला पडकलं. टीसी त्याच्याशी बोलत असताना तो इतका वेगाने धावला की, टीसी शांत उभा राहून बोलत होता. ही व्यक्ती त्याच्या समोर उभी होती. काहीवेळ तो टीसीशी बोलत होता. मात्र समोर धावण्याचा मार्ग दिसताच त्याने कोणतीही कसर सोडली नाही. तो लगेच पळून गेला. टीसी त्याला पळताना पाहत होता मात्र, तो त्याच्या मागे धावला नाही.
सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी रिएक्ट केलं असून बरेच जणांनी कमेंट देखील केलीये. यावेळी एका युजरने म्हटलंय की, ज्यावेळी धावण्यासाठी पाय मोकळे असतात तेव्हा तिकिटाचे पैसे का द्यावेत. दुसऱ्याने लिहिलंय की, मी आजपर्यंत कधीही इतके हसलो नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.