सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ट्रेनचा प्रवास करताना आपल्याला स्वत:ची काळजी घेणे गरजेचं आहे. थोडी जरी चूक झाली तरी आपला जीव जाण्याची शक्यता असते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉमवर अनेक पोलीस आणि आरपीएफचे जवान काम करतात. मात्र तरीही प्रवाशांचा निष्काळजीपणा त्यांचा जीव घेत आहे. आताही सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
रेल्वे पोलीस कायम प्रवाशांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर येतो. प्लॅटफॉर्मवर येताच त्याची ट्रेन सुटते. ट्रेन सुरू झाल्याने तो धावत-धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा तोल जातो आणि खाली आदळतो.
ट्रेन वेगात असल्याने तरुण थेट प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांमध्ये अडकतो. येथे त्याचे दोन्ही पाय अडकतात. पाय अडकल्याने तो ओरडू लागतो. तरुण येथे पडल्याचं एका ऑफ ड्यूटी पोलिसाच्या लक्षात येतं. त्यावर लगेचच बाळासाहेब ढगे या ऑफ ड्यूटी पोलिसांनी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या तरुणाला बाहेर खेचलं.
तरुणाचे फाय घट्ट धरून त्याला बाहेर खेचलं. अशा पद्धतीने त्यांनी या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. घडलेली संपूर्ण घटना स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून सध्या तो जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना गोरेगाव रेल्वेस्थानकातील आहे.
सदर व्हिडिओ @mumbaipolice या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओतून नेटकऱ्यांवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "अप्रतिम चांगल्या कार्यासाठी सलाम. आपला जीव धोक्यात घालून युवकाचे प्राण वाचवल्याबद्दल तुमच्या ग्रेट कार्यास सलाम. या कार्याचा महाराष्ट्र शासनाने योग्य तो सन्मान करावा हीच आशा.", अशा शब्दांत पोलिसांचे कौतुक केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.