Train Accident Video: दारुची नशा अन् Video Call... मथुरा ट्रेन अपघाताचे धक्कादायक कारण समोर; केबिनमधील CCTV फुटेज Viral

Mathura Train Accident: अपघाताबद्दल आता एक धक्कादायक खुलासा झाला असून ट्रेन चालकाचा केबिनमधील व्हिडिओ समोर आला आहे
Mathura Train Accident
Mathura Train AccidentSaatv
Published On

Uttar Pradesh News:

उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शन येथे रेल्वेचा एक विचित्र अपघात झाला. शकूरबस्ती-मथुरा ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढल्याची घटना समोर आली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचे धक्कादायक कारण आता समोर आले असून ट्रेन चालकाचा केबिनमधील संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार (26, सप्टेंबर) शकूरबस्ती रेल्वे स्टेशनवर ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढल्याने एकच गोंधळ उडाला. ट्रेन थांबल्यानंतर प्रवासी ट्रेनमधून उतरत होते. मात्र अचानक ट्रेन पुन्हा सुरु झाली आणि थेट प्लॅटफॉर्म तोडून वर चढली.

रात्रीची वेळ असल्याने प्लॅटफॉर्मजवळ ५ ते ६ जण उभे होते. सुदैवाने त्यांनी ट्रेन येताना पाहिली आणि तेथून पळ काढला. यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघाताबद्दल आता एक धक्कादायक खुलासा झाला असून ट्रेन चालकाचा केबिनमधील व्हिडिओ समोर आला आहे.

दारुच्या नशेत धुंद अन् मोबाईलवर व्हिडिओ कॉल....

चालकाच्या केबिनमधील व्हिडिओमध्ये लोको पायलट सीटवरून उठल्याचे दिसत आहे. त्यानंतर लाइटिंग कर्मचारी केबिनमध्ये प्रवेश करतो. तो कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. पाठीवर पिशवी होती. बोलता बोलता त्याने बॅग इंजिनच्या थ्रॉटलवर ठेवली, आणि यामुळेच पायलटचे दुर्लक्ष झाल्याने ट्रेन प्लॅटफॉर्म तोडून 30 मीटरवर चढली.

सचिन असे या बॅग ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्कोहोल टेस्टिंग मशीनने तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ज्यानंतर त्याने किती प्रमाणात मद्यसेवन केले होते, याबाबत खुलासा होईल.

दरम्यान, ट्रेन आल्यानंतर इंजिन केबिनच्या चाव्या तिथे आधीच उपस्थित असलेल्या सपोर्ट स्टाफला द्याव्या लागतात. अपघाताच्या रात्री सचिनला चावी देण्यात आली होती. असा खुलासा आगरा विभागीय व्यवस्थापक तेजप्रकाश अग्रवाल यांनी केला आहे. सध्या रेल्वेने 28 पानांचा तपास अहवाल तयार केला आहे. या आधारे लोको पायलटसह 5 रेल्वे कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com