Viral Video: स्टेडियममध्ये दिलं जातंय उष्ट कोल्ड्रिंक? व्हायरल व्हिडीओ पाहून बसेल मोठा धक्का!

Stadium cold drink video viral: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये कोल्ड्रिंक रिसायकल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

सध्या टी-२० वर्ल्डकपचे सामने खेळवले जात आहेत. भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये या वर्ल्डकपचे सामने खेळवण्यात येत आहेत. यावेळी दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावरही काही सामने खेळवले गेले. यामध्येच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

काय घडलंय व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लोकांना दिलेले कोल्ड्रिंकचे ग्लास गोळा केले जातात. यावेळी त्यामध्ये शिल्लक असलेलं कोल्ड्रिंक पुन्हा मोठ्या बाटल्यांमध्ये पुन्हा भरताना या व्हिडीओमध्ये दिसतंय. हे कोल्ड्रिंक पुन्हा पुढील सामन्यासाठी वापरलं जातं, असाही दावा करण्यात आला आहे

Viral Video
Viral Video: शेवटी बापाचं काळीज! मुलीच्या भवितव्यासाठी वडिलांची धडपड, सोबत घेऊन चालवतो रिक्षा; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती असं म्हणतेय की, "हे बघा... जे काही उरलंय ते बाटलीत पुन्हा भरण्यात येतंय. हेच कोल्ड्रिंक पुढील सामन्यासाठी वापरलं जाईल... तुम्हाला हा स्कॅम दिसतोय का?"

Viral Video
Viral Video: नवरा गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता, बायको अचानक पोहोचली, मॉलमध्येच झिंज्या धरून फ्री स्टाइल हाणामारी

या व्हिडिओमुळे आता लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. बाटल्या खरोखरच पुन्हा वापरल्या जातात का किंवा एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातंय का, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. जर हे खरं असेल तर केवळ निष्काळजीपणाच नाही तर प्रेक्षकांसाठी हा गंभीर आरोग्य धोका मानला जाणार आहे.

स्टेडियम व्यवस्थापन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, व्हिडीओची सत्यता पडताळून पुढची कारवाई करण्यात येणार आहे.

Viral Video
Viral Video: कष्टाची ताकद काय असते? ६० किलो वजन उचलणाऱ्या शेतकऱ्याच्या वाघीणीचा व्हिडीओ व्हायरल

युजर्सच्या काय प्रतिक्रिया?

अनेकांनी या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर टीका केली आहे. यामध्ये काहींनी हा आरोग्याशी खेळ असल्याचं म्हटलंय. तर काहींना यावर मजेशीरही कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हटलंय की, तो ही बाटली घरी घेऊन जाईल, तर काहींनी म्हटलंय की, हा असाच बिझनेस चालतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com