
Shocking Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी भेटीपूर्वी सुरत शहरात पोलिस दलाने सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीसाठी कठोर सराव केला.त्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.ज्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने एका चिमुकल्याला अमानुष मारहाण केली आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला सार्वजनिक रस्ता दिसून येत आहे.या व्हिडिओत पुढे पाहिले तर या रस्त्यावर एक पोलिस कर्मचारी दिसत आहे.मात्र त्यानंतर त्याच वेळी त्याच रस्त्यावरुन एक मुलगा सायकलवरुन जात असतो.पण तो पोलिस कर्मचारी त्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात करतो.त्यावेळी सर्व घडत असलेला प्रकार एका व्यक्तीने लपून कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर काही तासांपासून व्हायरल होत असून एक्स प्लॅटफॉर्मवरील ''@RoshanKrRaii'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये घडलेली घटना सांगितली असून पोलिसावर कारवाई करण्यात यावी असे लिहिले आहे.व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाईक्स मिळालेले असून अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.
सुरतमधील हा धक्कादायक(Shocking) प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी वर्गात संपात पसरलेला आहे.त्यातीलच काही लोकांनी पोलिसावर कारवाई करावी,अशी मागणी केलेली आहे तर काहींनी पोलिसाचा तत्काळा राजीनामा घ्यावी असे सांगितले आहे.तर काही यूजर्संनी त्या पोलिसाला चांगला मारल पाहिजे असे मत व्यक्त केलेले आहे.
टीप: पोलिसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.