Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral News: सलूनमध्ये मसाज आणि मान मोडून घेताना भयंकर घडलं; CCTV एकदा बघाच

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.
Published on

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक घटनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी गमतीदार व्हिडिओ असतात तर कधी क्षणात घडलेल्या भयंकर घटनांचे. ज्या घटनेमध्ये व्यक्तीचा जीवही जातो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीला मसाज करुन घेणे महागात पडलेले आहे. नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडिओत पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत सलून दिसत आहे. ज्या सलूनमध्ये एक व्यक्ती पेपर वाचताना दिसत आहे तर दुसरा व्यक्ती डोक्यांची मसाज घेताना दिसत आहे. काही वेळ सलूनमधला व्यक्ती हात दाबून देतो मात्र काही वेळात मान मोकळी करण्यासाठी तो मान फिरवतो पंरतू खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींची मान पूर्ण मोडते आणि तो खुर्चीवर पडतो. संपूर्ण घटना सलूनमधल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेली आहे.

सलूनधील घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो ''@vvbuzzz'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''सलून मध्ये मान मोडून घेणे किती धोकादायक ठरू शकते'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खूप धक्कादायक होत'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' काय कधी होईल सांगता येत नाही'',अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Video: OMG! कूलरमध्ये ८ फूट साप दबा धरुन बसला, घरातल्यांना पळती भुई थोडी, व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com