Bride Groom Market: शांघायमध्ये भरतो लग्नाचा बाजार; नवरा-नवरीसाठी लागते बोली, Video व्हायरल

Viral Video: लग्न जमविण्यासाठी आपल्याला विवाह ब्युरो माहित आहेत. पण चीनमध्ये चक्क नवरा नवरीचा बाजार भरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv

China Bride Groom Market Viral News

लोकं लग्न जमविण्यासाठी सहसा विवाह ब्युरोमध्ये जातात किंवा त्यांचे जीवन साथीदार शोधण्यासाठी विवाह साइटची मदत घेतात. याशिवाय, आपण अनेकदा लग्न जमविण्यासाठी नातेवाईकांचीही मदत घेतो. पण लग्न जमविण्यासाठी कधी बाजारात गेला आहात का? चीनमध्ये असा एक बाजार (Bride Groom Market) असल्याचं समोर आलं आहे.  (Latest Marathi News)

आतापर्यंत आपण भाजीपाल्याचा बाजार, जनावरांचा बाजार, कपड्यांचा बाजार भरल्याचं पाहिलं आहे. पण चीनमध्ये चक्क नवरा नवरीचा बाजार भरतो, असा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत (China Bride Groom Market) आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. चीनच्या शांघायमध्ये एक मार्केट आहे, तिथे लोक पती-पत्नी खरेदी करण्यासाठी येतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चीनमध्ये भरतो लग्नाचा बाजार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये चीनमधील एका मार्केटमध्ये नवरा-नवरीसाठी कशा प्रकारे बोली लावत आहेत, हे दिसत आहे. हा व्हिडीओ बनवणारा हॅरी जॅगार्ड याने सांगितलं (Viral Video) की, आम्ही शांघायमधील लग्नाच्या बाजारात आलो आहोत. जिथे आई-वडील, आजी-आजोबा आपल्या मुलांसाठी वधू-वरांना पाहण्यासाठी आले आहेत.

या बाजारपेठेत मोठी गर्दी दिसतेय. येथे अनेक मुले-मुली बाजारात उभी असलेली दिसतात. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत (Viral News) आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 13 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

Viral Video
Viral Video : हवेत ४००० फुटांवर पॅराग्लायडिंग करताना बेल्ट निघाला, ४ मिनिटपर्यंत हवेत लटकला; थरारक VIDEO समोर

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हॅरी जॅगार्ड हा चीनमधल्या लग्ना्च्या बाजारात पोहोचला आहे. तिथे लोकं स्वतःसाठी पती-पत्नी शोधण्यासाठी आल्याचं दिसत आहे. अनेक लोक आपल्या मुलांसाठी वधू-वर शोधण्यासाठी या बाजारात येतात, असं त्यानी म्हटलं (Bride Groom Market Viral News) आहे. यावर लोक आपापल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

आतापर्यंत आपण वेगवेगळे बाजार पाहिले आहेत, पण लग्नाचा बाजार सर्वांनाच नवीन आहे. चीनमध्ये असा आगळावेगळा बाजार भरत असल्याचं समोर आलं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video : पत्नीला खांद्यावर घेऊन शर्यत जिंकायची होती; पळता-पळता पाय घासरला अन्... पाहा व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com