Viral Video : पत्नीला खांद्यावर घेऊन शर्यत जिंकायची होती; पळता-पळता पाय घासरला अन्... पाहा व्हिडिओ

Couple Viral Video : तीने आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन पळत शर्यत जिंकायची आहे. आता यात अनेक जोडप्यांनी सहभाग घेतलाय. सर्व पती आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन उभे आहेत.
Viral Video
Viral VideoSaam TV

Couple Video :

सोशल मीडियावर जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ दोघांमधील प्रेम, मैत्री आणि आदर दाखवतात तर काहींमध्ये द्वेष आणि भांडणे पाहायला मिळतात. तर काही व्हिडिओमध्ये हौस, मौज मजामस्ती पाहायला मिळते. सध्या सोशल सोशल मीडियावर एका पती पत्नीचा हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Viral Video
Glenn Phillips Flying Catch Video : फिल्डर नाही, सुपरमॅन बोला...; ग्लेन फिलिप्सने हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, पाहा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मैदानात शर्यत सुरू आहे. ही एक धावण्याची शर्यत आहेत. यामध्ये पती आणि पत्नी दोघांनाही सहभागी व्हायचं आहे. यात पतीने आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन पळत शर्यत जिंकायची आहे. आता यात अनेक जोडप्यांनी सहभाग घेतलाय. सर्व पती आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन उभे आहेत.

शर्यत सुरू होताच सर्वजण जिंकण्यासाठी धावत सुटतात. आपला पहिला नंबर यावा म्हणून एक पती जोरदार पळू लागतो. मात्र तितक्यात त्याचा पाय घसरतो आणि तो खाली पडतो. आता तो खाली पडल्यावर त्याच्या खांद्यावर असलेली पत्नी देखील खाली पडते. अचानक पडल्याने पत्नी थेट तोंडवर आपटते.

आता या महिलेला चांगलंच लागलं असणार मात्र हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू येत आहे. सध्या हा मजेशिर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकत्यांनी विविध कमेंट केल्यात. अनेकांनी यावर हसण्याचे ईमोजी शेअर केले आहेत. एका तरुणीने यावर प्रेमात इतकी रिस्क घेणारी व्यक्ती पाहिजे असं लिहिलं आहे.

तर काहींनी या महीलेची मान मोडली असेल असं लिहिती तिची काळजी व्यक्त केलीय. प्रेमात प्रत्येक व्यक्ती असाच पडतो असं ही काहींनी लिहिलं आहे. व्हिडिओ ज्या पद्धतीने एडिट केलाय त्यासाठी 21 तोफांची सलामी असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Viral Video
Pimpri-Chinchwad Cime News: सोशल मीडियावर PM नरेंद्र मोदी-अमित शहा यांची बदनामी; पिंपरी चिंचवडमधील तरुणाला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com