२५ हजार फूट उंचीवरून ताशी ३०० किलोमीटर वेगाने उड्डाण करणाऱ्या एका विमानावर वीज कोसळल्याची घटना व्हँकुव्हर येथे घडलीय. विमानावर वीज पडल्यानंतर ४०० प्रवाशी ओरडू लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.(Latest News)
जर एखाद्या व्यक्तीवर वीज पडली तर त्याचा मृत्यू होत असतो. विमानावर वीज पडल्यानंतर विमानाचं काय झालं असेल किंवा त्यातील प्रवाशांचे काय झाले असेल असा प्रश्न अनेकांना पडला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे कोणतेच नुकसान झाले. परंतु व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला होता.
१६ सेकंदाचा व्हिडिओ
मीडिया रिपोर्ट्सनुसार,एअर कॅनडाचे बोइंग-७७७ विमानाने व्हँकुव्हर विमानतळावरून लंडनच्या हिथ्रोकडे जाण्यासाठी उड्डाण घेतले. विमानाने टेक ऑफ केलं त्याचवेळी हवामान खराब झाले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. विमान २५ हजार फुटावर पोहोचल्यानंतर वीज कोसळली. या घटनेचा व्हिडिओ @thenewarea5 नावाच्या 'एक्स' वर अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओ फक्त १६ सेकंदाचा असून हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. भयानक दृश्य पाहिल्यानंतर पायलटला सतर्क राहण्यासाठी कॉफी पिण्याची गरज भासणार नाही,असं एक युझर म्हणालाय. हे दृश्य खरोखरच भयानक असल्याचं एकाने म्हटलंय. वीजेचा स्पार्क काही हजारो व्होल्ट होता. वीजेचा विमानावर कोणताच परिणाम होत नाही. कारण विमानाचा बाहेर थर हा कार्बनचा बनलेला असतो.
इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळलं
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक विमान कोसळल्याची दुर्घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विमानाचा पायलट महामार्गावर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता, त्याचदरम्यान हे विमान एका कारला धडकले. यानंतर विमानाने पेट घेतला. एनटीएसबी आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, या जेटमध्ये पाच लोक होते. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम फ्लोरिडामध्ये एक लहान विमान महामार्गावर इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या प्रयत्नात होते. या प्रयत्नात हे विमान एका कारला धडकलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.