Plane Crash: इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळलं; लँडिंगवेळी महामार्गावरील कारला धडक, व्हिडिओ व्हायरल

US Florida Plane Crash: फ्लोरिडामध्ये एक विमान कोसळल्याची घटना घडलीय. हे विमान रस्त्यावर धावणाऱ्या कार कोसळल्यानंतर विमाने पेट घेतलाय. विमानातील ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. जमिनीवर असलेल्या दोन वाहनांना विमानाची धडक बसली. यात दोन जणांचा मृत्यू झाला.
US Florida Plane Crash
US Florida Plane CrashSaam Tv
Published On

US Florida Plane Crash Collides On vehicles :

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक विमान कोसळल्याची दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विमानाचा पायलट महामार्गावर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता, त्याचदरम्यान हे विमान एका कारला धडकले. यानंतर विमानाने पेट घेतला. एनटीएसबी आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, या जेटमध्ये पाच लोक होते.(Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम फ्लोरिडामध्ये एक लहान विमान (Plane) महामार्गावर इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या प्रयत्नात होते. या प्रयत्नात हे विमान एका कारला धडकलं. कारशी धडक होताच विमानाने पेट घेतला. यामुळे रस्त्यावर वाहतूक (Transport)कोंडी झाली होती. नॅशनल ट्रान्सपोर्ट स्पेटी बोर्ड (एनटीएसबी) याविषयी माहिती देताना सांगितले की, बॉम्बार्डियर चॅलेंजर ६०० बिजनेस जेटने ओहियो येथून उड्डाण घेतलं होतं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवेत असताना विमानातील दोन्ही टर्बोफॅन इंजिनमध्ये बिघाड झाला होता, याची माहिती पायलटने रेडिओवर दिली होती. नैऋत्य फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टवरील नेपल्सजवळ इंटरस्टेट ७५ वर क्रॅश झाल्यानंतर विमानाला आग लागली. विमान दुर्घटनाग्रस्त झाले त्यावेळी हे विमान नेपल्स विमानतळाजवळ होते. घटनास्थळावरील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान हे दुर्घटनाग्रस्त विमान महामार्गावरील एका कार आणि पिकअप ट्रकला धडकलं, असे फ्लोरिडा हायवे गस्ती घालणाऱ्या पथकाने सांगितले.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही सेकंदातच विमानाने एका कारला धडक दिली. या धडकेत कारचा चुराडा झाला. काही वाहन चालकांनी विमान खाली कोसळत असल्याचं पाहताच वाहनातून उतरत दुसऱ्या बाजूला पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. एनटीएसबी आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, जेटमध्ये पाच लोक होते. महामार्गवर गस्त घालणाऱ्या पथकानुसार, विमानातून तीन लोक प्रवास करत होते. विमानातील तीन जण वाचले तर इतर दोघांचा मृत्यू झाला.

परंतु हे मृत पावलेले दोन जण विमानात होते की, कार मध्ये हे त्यांनी सांगितले नाही. मियामीमधील टेलिव्हिजन स्टेशन डब्ल्यूपीएलजीने सांगितले की, पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये नेपल्स नियंत्रण टॉवरला सांगितलं होतं की, विमानाचे दोन्ही इंजिन खराब झाले आहेत. ते विमान विमानतळावर पोहोचू शकत नाही.

US Florida Plane Crash
Plane Crash: युक्रेनियन कैद्यांना घेऊन जाणारं रशियन लष्करी विमान कोसळलं, ६५ जण ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com