QR कोडने Russian Influencer शोधतेय भारतीय नवरा, हटके प्रपोजल पाहून कॉमेंट्स सुसाट

Russian Influencer Looking Husband : हा व्हिडिओ रशियन प्रभावशाली दिनाराने शेअर केलाय. यात ती भारतीय वराच्या शोधात आहे.
QR कोडने Russian Influencer शोधतेय भारतीय नवरा, हटके प्रपोजल पाहून कॉमेंट्स सुसाट
Russian InfluencerRussian Influencer Looking Husband

इंटरनेटवर अनोख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कंटेंट हा राजा असतो, तो जितका मजेदार आणि मनोरंजक असतो तितकाच तो व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे. हा व्हिडिओ रशियन इन्फ्लुएन्सर दिनाराने शेअर केलाय. यात ती भारतीय वराच्या शोधात असल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रशियन इन्फ्लुएन्सर दिनारा एका मॉलमध्ये लाल साडी नेसलेली दिसत आहे. यादरम्यान, तिने हातात एक फलक धरलाय. ज्यावर तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलचा क्यूआर कोड दिसत आहे, ज्यावर लिहिले आहे, 'मी भारतीय पतीच्या शोधात आहे. ' एवढेच नाही तर त्यासोबत मेसेज पाठवण्याबाबतही लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ पोस्ट करताना दिनाराने एक कॅप्शनमध्ये लिहिलंय यात 'तो शोधण्यात मला मदत करा.' असा कॅप्शन तिने दिलाय.

दरम्यान दिनाराने शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दिनाराने शेअर केलेल्या व्हिडिओ पाहून यूजर्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. कोणी तिला लग्नाची मागणी घालत आहेत. तर कोणी तिची विचारणा करत आहेत. पाच दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत८.३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९४ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

QR कोडने Russian Influencer शोधतेय भारतीय नवरा, हटके प्रपोजल पाहून कॉमेंट्स सुसाट
Mangaaji Struggle Story : इन्फ्लुएन्सर मंगाजीची फिल्मी कहाणी ; शेतकरी ते सोशल मीडिया स्टारपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com