Nandurbar News : ६२ मतदान केंद्रांवर नेटवर्क, इंटरनेट सुविधेचा अभाव; अक्कलकुवा- धडगाव विधानसभा मतदार संघातील स्थिती

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर सोयी सुविधा करण्याचे काम केले जात आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना प्रशासनाकडून तयारी सुरु आहे. मतदानासाठी (Nandurbar) केंद्र निश्चित करण्यात आले असून त्याठिकाणी सर्व सुविधा करण्याचे काम देखील प्रशासनाकडून केले जात आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील (Akkalkuwa) अक्कलकुवा- धडगाव मतदार संघातील ६२ केंद्रावर नेटवर्कची समस्या आहे.  (Maharashtra News)

Nandurbar News
Manmad Bajar Samiti : मनमाडमध्ये खाजगी जागेत कांदा लिलाव; बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर सोयी सुविधा करण्याचे काम केले जात आहे. यात प्रामुख्याने वीज. पाणी, (Internet Service) इंटरनेट, मोबाईल नेटवर्क कसे आहे याची तपासणी करून ती सुविधा पुरविली जात आहे. दरम्यान काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क. इंटरनेटचा अभाव असल्याचे पाहण्यास मिळते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Shirpur News : कारमधून गांजाची तस्करी; ५४ किलो गांजासह तिघांना अटक

नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. मात्र अक्कलकुवा- धडगाव विधानसभा मतदार संघातील ६२ मतदान केंद्रांवर नेटवर्क आणि इंटरनेट सुविधेचा अभाव राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाला या ६२ केंद्रांसाठी अधिक परीक्षण करावे लागणार आहे. परंतु या केंद्रांची माहिती घेण्यासाठी तात्काळ सुविधा कशा उपलब्ध होणार आहेत. हे प्रशासनासाठी एक मोठा आव्हान राहणार असून, या आव्हानाचं मार्ग प्रशासन कसं काढणार हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com