'खली बली' गाण्यावर महिला मंडळचा धम्माकेदार डान्स; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Women Dance Video: डान्स व्हिडिओ म्हटलं की प्रत्येकजण आवर्जून पाहतो. त्यातच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात महिलांनी अतिशय धम्माकेदार पद्धतीने डान्स केलेला आहे.
Women Dance Video
Dance VideoSaam Tv
Published On

Social Media Viral Dance: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही महिला मंडळाच्या सदस्यांनी 'खली बली' या बॉलीवूडमधील गाण्यावर केलेला डान्स पाहायला मिळतोय. त्यांच्या धम्माल आणि ऊर्जेने भरलेल्या परफॉर्मन्समुळे हा व्हिडिओ नेटिझन्सच्या विशेष पसंतीस उतरतोय.

महिलांनी हा डान्स (Dance)व्हिडिओ वटसावित्रीची पुजा केल्यानंतर बनवलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येक महिला पारंपरिक साड्यांमझ्ये सजलेल्या आहे. त्यानंतर डान्स करण्यासाठी त्या अगदी उत्साहात दिसून असून त्यानंतर त्या 'खली बली' या गाण्यावर ताल धरतात. डान्स करताना प्रत्येकीचा आत्मविश्वास, आनंद आणि एकमेकांमधील टीमवर्क अगदी स्पष्ट जाणवतं.

सोशल मीडियावर याआधीही या महिलांचे अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल(Viral) झालेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओला नागरिकांनी मोठी पसंतीही दिलेली आहे. मात्र, हा व्हिडिओ सध्या funny_raada या इन्स्टाग्राम अकाउंटवर १९ तासांपूर्वी अपलोड केलेला आहे आणि काही तासांतच अनेक लाईक्स देखील मिळालेले आहेत.

नेटकऱ्यांची डान्सला मोठी पंसती

प्रत्येक महिलेचा उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद हा नेटकरी वर्गाला आवडलेला आहे. काहींनी तर कमेंटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. एका यूजने कमेंट केली,''चाळीतल्या बायकांचा नाद वेगळा च असतो बरका'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खरचं या महिला आयुष्य खुप छान जगत आहेत'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''हवामान अंदाज खरा ठरेल...आज वादळ वडाच्या झाडाला फेरी मारून सात जन्मसाठी धडकणार'' अशा गमंतशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Women Dance Video
Couple Dance Video: कमालच! दादा कोंडकेच्या गाण्यावर नवरा-बायकोचा डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com