Viral Video: भारताच्या विजयाचा जल्लोष पाकिस्तानात, केक कापला अन्...; पाहा व्हायरल व्हिडिओ

Pakistani family celebrates India T20 World Cup victory : टीम इंडियाने टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाकिस्तानातील एका कुटुंबाने घरात केक कापून भारताच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pakistani family celebrates India T20 World Cup victory
Pakistani family celebrates India T20 World Cup victorysaam tv
Published On

रविवारी रात्री टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं. संपूर्ण देशभर या विजयाचा जल्लोष करण्यात येतोय. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील एका कुटुंबाने भारताच्या विजयाचा आनंद साजरा करत केक कापल्याचं पाहायला मिळतंय.

कुटुंबातील सदस्य आनंदाने टाळ्या वाजवत आणि हसत हा भारताचा आनंदाचा साजरा करताना दिसतायत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा जगातील हायव्होल्टेज सामना मानला जातो. त्यामुळे हा व्हिडिओ अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Pakistani family celebrates India T20 World Cup victory
Viral Video: मॅगीच्या एका पाकिटात किती नूडल्स असतात? तरुणाने मोजला एक-एक नूडल, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या कुटुंबाने भारताच्या टी-२० वर्ल्डकपचा विजयाचा आनंद आपल्या घरात केक कापून साजरा केला. घरातील सदस्यांनी एकत्र जमून हा जल्लोष केला. यावेळी टाळ्या वाजवल्या आणि एकमेकांचं अभिनंदनही केलं. हा छोटासा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला.

Pakistani family celebrates India T20 World Cup victory
Viral Video: धावत्या ट्रेनमधून तरुण पडला, दारावर उभं राहून स्टंट करताना भयंकर घडलं; काळजाचा ठोका चुकवणा VIDEO

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच तणावपूर्ण परिस्थितीत होतात. दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी हा सामना केवळ खेळ नसून प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील एका कुटुंबाने भारताच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचा हा प्रसंग अनेकांच्या नजरा वेधून घेतोय.

Pakistani family celebrates India T20 World Cup victory
Viral bike video: एक, दोन नाही तर बाईकवर बसले तब्बल ९ जणं; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जातायत. अनेक युजरने हा प्रसंग क्रिकेटच्या सामर्थ्याचं उदाहरण असल्याचं म्हटलंय. काहींनी कमेंट करत म्हटलंय की, 'क्रिकेट लोकांना एकत्र आणण्याची ताकद ठेवतं.' तर काहींनी 'हा खूप सुंदर आणि छान क्षण आहे,” अशा शब्दात या कुटुंबाचं कौतुक केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com