Nashik : बुटाची लेस बांधत होता अन् घात झाला; शिक्षकाच्या कारने चिमुरड्याला चिरडले

school campus accident : इगतपुरीतील शाळेच्या आवारात शिक्षकाच्या कारखाली सापडून पहिलीतल्या ६ वर्षीय विद्यार्थ्याला दुखापत. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पालकांचा संताप; पोलिसांकडून तपास सुरू.
school campus accident
school campus accident Saam TV Marathi News
Published On

Igatpuri school accident CCTV video : नाशिकच्या इगतपुरीतील शाळेतील काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. शाळेच्या आवारातच पहिलीत शिकणारा ६ वर्षांचा चिमुकल्या मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. मुलगा आपल्या बुटाची लेस बांधत होता, त्यावेळी एका शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या अंगावरून कार गेली. शाळा सुटण्याच्या वेळी घडलेल्या या अपघातात विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुलाच्या डोक्याला ४ टाके पडले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही फुटेज लपवल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिकमध्ये कच खळबळ उडाली. शिक्षक यश कदम आणि शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शाळेच्या आवारातच अशा घटना घडत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

school campus accident
PM Modi : न भूतो न भविष्यति! पंतप्रधान मोदींचं इंस्टाग्रामवर 'शतक'; असा पराक्रम करणारे जगातील पहिले नेते

नाशिकच्या इगतपुरीच्या एका शाळेच्या आवारात कारने एका लहान मुलाला धडक दिल्याचा व्हिडिओ समोर आला. पहिलीत शिकणारा ६ वर्षीय विद्यार्थी जखमी झाला. विद्यार्थी बुटाची लेस बांधत असताना शिक्षकाची कार विद्यार्थ्याच्या अंगावरून गेली. त्यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली असून ४ टाके पडले आहेत. मुलाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शाळा सुटण्याच्या वेळी ही घटना घडली आहे.

school campus accident
पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! प्रवासाचा वेळ वाचणार, या दिवशी सुरू होणार लोकल, कोणती असतील स्थानकं?

शिक्षक चालक यश कदमसह शाळा व्यवस्थापनावर संशयित म्हणून इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेने चुकीची माहिती दिल्याचा तक्रारदाराचा आरोप केला आहे. सीसीटीव्ही फुटेज न दाखवणे व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही पालकांकडून करण्यात आला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

school campus accident
भाजप आमदाराच्या मुलाचा टोल नाक्यावर राडा, पैसे मागितले म्हणून कर्मचाऱ्याला मारले, घटना CCTV मध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com