Nagpur Video : दोन्ही हात हवेत, स्कूटीवर मांडी घालून बसला, पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये भयंकर स्टंट; VIDEO

Nagpur Viral Video: नागपूरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती स्कूटीवर स्टंट करताना दिसत आहे.
Nagpur Video
Nagpur VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काहीजण तर रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी जीवघेणे स्टंट करत असतात. हे स्टंट त्यांच्या अंगलट येऊ शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार पुलावरुन जाताना स्टंट करताना दिसत आहे.त्याने स्कूटीवरुन जाताना हँडल सोडला आहे. हँडल सोडून तो नुसता स्कूटीवर मांडी घालून बसलेला दिसत आहे. गाडीच्या त्याच्या या स्टंटमुळे त्याचा जीवदेखील जाऊ शकतो.

Nagpur Video
Viral News: ओरफिश दिसला, देशावर मोठं संकट येणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातील पारडी उड्डाण पुलावर ही घटना घडला आहे. या पुलावर जाताना एक दुचाकीस्वार स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.विशेष म्हणजे, हा दुचाकीस्वार पोलिसांसारख्या युनिफॉर्ममध्ये असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या व्यक्तीचा युनिफॉर्म पोलिसांप्रमाणे असला तरी तो प्रत्यक्षात पोलीस आहे की नाही, याची अद्याप खातरजमा झालेली नाही. सध्या नागपूर पोलीस या दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे, यासंदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Nagpur Video
Viral : वीट भट्टीवरील कामगाराने बिबट्याला शिकवला धडा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

व्हिडिओत नक्की आहे तरी काय?

एक दुचाकीस्वार पुलावरुन स्कूटी घेऊन जाताना दिसत आहे. या व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातला आहे. त्याने सुरुवातीला स्कूटीच्या हँडलवरचा हात काढला आणि मागे सरकला. त्यानंतर पायदेखील वर घेऊन मांडी घालून बसला. त्याच्या स्कूटीचा तोल जाताना दिसत आहे. हा व्यक्ती हँडलवरुन हा काढून काहीतरी करताना दिसत आहे. हात हवेत उडवताना दिसत आहे. हे असे स्टंट तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Nagpur Video
Viral Couple: लिफ्टमध्ये विद्यार्थ्यांची रासलीला! आधी मुलीने मुलाला स्वत:कडे खेचलं, अन् किस करत.. 'तो प्रसंग' तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com