Viral : वीट भट्टीवरील कामगाराने बिबट्याला शिकवला धडा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

Leopard Attacks Video : उत्तर प्रदेशच्या वीट भट्टीवर बिबट्याने हल्ला केला. मिहीलाल नावाच्या युवकाने बिबट्याशी झुंज दिली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पाच मजूर जखमी, बिबट्याला पकडले गेले.
Brave Youth Injured While Fighting Leopard in Dramatic Encounter Captured on Camera
UP: Youth Fights Leopard at Brick Kiln, Shocking Video Goes ViralSaam TV News Marahi
Published On

Leopard Viral Video News : वीट भट्टीवर तरूण आणि बिबट्या यांच्यातील संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जीव वाचवण्यासाठी दोघेही एकमेकांवर हल्ला करत होते. पण धक्कादायक म्हणजे, वीट भट्टीवर काम करणारा तरूण बिबट्यासोबत दोन हात करत होता, उपस्थित असणाऱ्या लोकांनी विटा फेकून मारल्या. त्यामधील काही विटा त्या तरूणालाही लागल्या. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. बिबट्यासोबत भिडणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतील. एखाद्या चित्रपाटात शोभावा असा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिबट्या आणि वीट भट्टीवरील कामगार यांच्यातील संघर्षाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील धौरहरा येथील जुगनूपुर येथील वीट भट्टीवरील आहे. सोमवारी सकाळी बिबट्या अचानक वीट भट्टीवर अवतरला, त्यानंतर एकच खळबळ उडाली. वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका तरूणाने त्या बिबट्यासोबत दोन हात केले. बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. तरूण बिबट्याला भिडल्याचा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिथे धाडस आहे, तिथे यश असं कमेंट्समध्ये अनेकजण म्हणत आहे.

Brave Youth Injured While Fighting Leopard in Dramatic Encounter Captured on Camera
रेल्वेचे तिकीट दर वाढले, १ जुलैपासून प्रवास महागणार, कशी असेल नवी भाडेवाढ?

जुगनूपुर येथील वीट भट्टीवर अचानक बिबट्या आला. बिबट्याने मिहीलाल नावाच्या युवकावर अचानक हल्ला केला. बिबट्याला पाहाताच वीट भट्टीवर काम करणारे सर्वजण मजूर प्रचंड घाबरले. पण मिहीलाल याने बिबट्यासोबत झुंज दिली. चाल करून आलेल्या बिबट्याला त्याने धडा शिकवला. मिहीलालने बिबट्याला विटांवर दाबून धरल्याचे दिसतेय. बिबट्या आणि तरूणाचा संघर्ष सुरू असताना काही लोकांना विटा मारल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.

Brave Youth Injured While Fighting Leopard in Dramatic Encounter Captured on Camera
Palkhi Video : माऊलींच्या पालखी सोहळ्यात बैल उधळला, सासवडमधील व्हिडिओ व्हायरल

बिबट्यासोबत दोन हात करताना मिहीलाल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयत उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याही जखमी झाला असून वन विभागाचे अधिकारी त्याला पडकण्यासाठी आले. बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. वनविभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत बिबट्याला ट्रँक्विलायझरच्या साहाय्याने पकडले. गावकऱ्यांनी विटा मारल्यानंतर तेंदुआ जवळच्या केळीच्या शेतात पळाला होता. कठीण परिश्रमानंतर वनकर्मचाऱ्यांनी तेंदुआला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवले.

Brave Youth Injured While Fighting Leopard in Dramatic Encounter Captured on Camera
Pune : महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com