Palkhi procession Pune Dive Ghat bull incident : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं विठुरायाकडे निघाला आहे. माऊलीच्या पालखी आज जेजूरीमध्ये दाखल झाली. रविवारी दिवे घाट पार करून पालखी सासवड मुक्कामी पोहोचली असून, येथे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती. दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंढरीच्या वाटेत काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अनुभव येतोय. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत वारकरी आपली सेवा व भक्तीभावात तल्लीन होत वाट चालत आहेत. दिवे घाट पार केल्यानंतर सासवड जवळ अचानक गर्दीमुळे बैल उधळला. सासवडच्या जवळ माऊलीची पालखी विसावाल्या थांबली होती, त्यावेली गर्दीमुले एक बैल उधळला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती, याचा व्हिडिओ आता समोर आलाय.
पालखी सोहळ्यात अचानक बैल उधळल्यामुळे वारकरी आणि नागरिकांची धावपळ उडाली. थोड्यावेळासाठी पालखीमध्ये भीतीचे वातावरण होते, पण त्या बैलाला कंट्रोल केल्यानंतर वातावरण शांत झालं. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. दिवे घाट सर करण्यासाठी माऊलींच्या रथाला चार ते पाच बैल जोड्या होत्या. त्यामधील एक बैल गर्दी पाहून उधळला अन् गोंधळ उडाला होता. वेळीच बैलावर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
लाखो वारकरी खंडोबा दर्शनासाठी जेजुरी गडावर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत दाखल होणार आहे. आज पहाटेपासूनच लाखो वारकरी खंडोबाच्या दर्शनासाठी गडावर जमले आहेत…शैव आणि वैष्णव परंपरेचा हा अनोखा संगम आज जेजुरीत खंडोबा गडावर होतोय…ड्रोन कॅमेऱ्यातून पाहूया खंडोबा गडाची ही खास दृश्यं...वारकऱ्यांची मांदियाळी, फड, अभंग, टाळ मृदुंगाचा गजर... आणि त्या भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दाखल होणार आहे…खंडोबा गडावरचा लाखो वारकऱ्यांचा आजचा नजारा म्हणजे वारी परंपरेचा एक अध्याय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.