How Old Is Your Mobile Number : तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिक युगात मोबाइल जसा बदलला जातो, तसाच मोबाइल नंबरही अनेकजण बदलत असतात. पण काहीजण वर्षानुवर्षे एकच मोबाइल नंबर वापरतात. जर मोबाइल नंबर व्यक्तीचं व्यक्तिमत्व अन् तो व्यक्ती कसा आहे, हे सांगत असेल तर? होय, सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. त्यामध्ये पाच वर्षे एक मोबाइल नंबर वापरणाऱ्यांबद्दल पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तुमचा मोबाइल नंबर किती वर्षे जुना आहे? त्यावरून तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व समजणार, असा दावा त्यामधून करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर ३१ सेकंदाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाच वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वर्षे एकच मोबाइल नंबर वापराऱ्याचं (What your long-time mobile number says about your character) व्यक्तिमत्व अन् स्वभाव कसा आहे? याबाबत सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकजण व्हिडिओ पाहून स्वभाव कसा आहे, याचा अंदाज बांधत आहे. व्हिडिओवर कमेंट्स अन् लाईक्स पाऊस पडत आहे. पाहा व्हिडिओ
मोबाइल नंबर सांगणार, तुमच्याबद्दल....
हा व्हिडिओ एका कारमध्ये शूट करण्यात आला आहे. हायवेवरील वाहतूककोंडी या व्हिडिओत दिसत आहे. बॅकग्राऊंडला व्हाइस ओव्हर दिसतोय. त्यामध्ये मोबाईल नंबरबद्दल पाच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करताना पाच वर्षात एक मोबाइल नंबर.. पाच फॅक्ट.. असे कॅप्शन लिहिण्यात आले आहे. पाच वर्षे तुम्ही एकच मोबाइल नंबर वापरत असाल तर त्याबाबत पाच रोचक फॅक्ट सांगणार असल्याचे व्हिडिओत तो व्यक्ती बोलत आहे.
पाच वर्षे एकच मोबाइल नंबर वापरताय, तर तुमच्याबद्दल पाच गोष्टी खऱ्या ठरतील, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, त्याबाबत समजेल.
1. तुमच्यावर कोणते गुन्हा दाखल नाही, अथवा कोर्टात केस सुरू नाही.
2. तुम्ही सभ्य आहात, त्याशिवाय जोडीदारासोबत इमानदार आहात.
3. तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही, अथवा उधारी नाही.
4. तुमची देवाणघेवाण व्यवस्थित आहे. तुम्हा कोणतेही लफडेबाज नाही.
5. तुम्ही जबाबदार आणि विश्वासू व्यक्ती आहात.
३१ सेकंदाचा हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) @aksh_44 या खात्यावरून २० एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला दोन लाख लोकांनी पाहिलेय. ३८ हजार कमेंट्स आहेत, तर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. "५ वर्षात एकच मोबाइल नंबर, ५ फॅक्ट्स" असे पोस्टवर लिहिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.