Marathi Actor Tushar Ghadigaonkar Suicide : मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वातून एक अतिशय दुखद बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर यानं आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी तुषारने टोकाचा निर्णय घेतला. तुषार याच्या अकाली जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या जवळच्या मित्रांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. (Tushar Ghadigaonkar Marathi actor death reason)
मन कस्तुरी रे, लवंगी मिरची, भाऊबळी, उनाड, झोंबिवली, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान यासारख्या कलाकृतींमधूनन तुषारने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तुषार घाडीगावकर याने 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. याशिवाय, अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्याच्या चाहत्यांसाठी आणि सहकलाकारांसाठी हा मोठा आघात आहे.
तुषार याचा जवळचा मित्र अंकुर वाढवे याने सोशल मीडियावर तुषारसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अंकुरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो. तुझ्या आठवणी कायम आमच्यासोबत राहतील." या पोस्टने अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. चाहत्यांनीही तुषार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तुषार यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना या दुखद प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी व्यक्त केली आहे.
सन मराठीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत नुकतेच त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. त्याच्या अकाली निधनाने चाहते आणि सहकलाकार यांच्यावर शोककळा पसरली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे जन्मलेल्या तुषारने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात नाट्य विभागात त्याने आपली कला सिद्ध केली होती. मित्रपरिवारात ‘घाड्या’ या टोपणनावाने लोकप्रिय असलेला तुषार आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्त्वासाठी आणि अभिनयातील नैसर्गिकतेसाठी ओळखला जायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.