Nagpur : नागपूरमध्ये हिट अ‍ॅण्ड रन, ट्रकने २ दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू, २ जखमी

Nagpur hit and run : नागपूर जिल्ह्यातील चक्री घाटात ट्रक आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. ट्रकचालक फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.
Nagpur  Accident
Scene from Chakri Ghat where a speeding truck hit two motorcycles, leading to two deaths and two serious injuries. Saam TV News
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी तालुक्यातील काटोल मार्गावरील चक्री घाटात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत पहिल्या दुचाकीवरील मंगेश शंकर खाडे (वय ३७) आणि पवन सुनील सेंबेकर (वय २३, दोघेही रा. पोरगव्हाण, जि. अमरावती) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील आकाश वासुदेव जवणे (वय ३२) आणि गौतम श्रावण बागडे (वय २४, दोघेही रा. जलालखेडा, ता. नरखेड) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Nagpur  Accident
Accident : पुलाचे कठडे तोडून कार नदीत कोसळली; ५ जणांचा दुदैवी अंत

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात चक्री घाटातील वळणावर घडला. ट्रकचालकाने बेपर्वाईने वाहन चालवत विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, पहिल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nagpur  Accident
Vande Bharat : पंतप्रधान मोदींनी नव्या वंदे भारतचे केलं उद्घाटन, कुठून कुठपर्यंत धावणार, तिकिट किती असणार?

कोंढाळी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी ट्रकचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nagpur  Accident
ZP school : जिल्हा परिषदेच्या तब्बल ८ शाळांना टाळं, नेमकं कारण काय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com