Vande Bharat : पंतप्रधान मोदींनी नव्या वंदे भारतचे केलं उद्घाटन, कुठून कुठपर्यंत धावणार, तिकिट किती असणार?

Vande Bharat route fare IRCTC train booking : पाटलीपुत्र ते गोरखपूर वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाला. ही ट्रेन मुझफ्फरपूर व बेतिया मार्गे धावेल. प्रवासाचा वेळ ७ तासांपर्यंत कमी होणार असून, बिहार-उत्तर प्रदेशमधील प्रवाशांसाठी ही ट्रेन उपयुक्त ठरणार आहे.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressGoogle
Published On

New Vande Bharat Express, PM Modi train launch : बिहार राज्याला दहावी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटलीपुत्र (पटना) ते गोरखपूर दरम्यानच्या नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन मुझफ्फरपूर आणि बेतिया मार्गे धावेल. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील प्रवाशांसाठी जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणार आहे. ३८४ किमी अंतर पार करणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग तासी ११० इतका असेल. वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ चार ते पाच तास कमी होणार आहे. यापूर्वी या मार्गावरील प्रवासाला 10-12 तास लागायचे, पण आता हा प्रवास सुमारे 7 तासांत पूर्ण होईल.

पाटलीपुत्र (पटना) ते गोरखपूर दरम्यान धावणारी ही सेमी-हायस्पीड वंदे भारत ट्रेन (26501/26502) आठवड्यातून सहा दिवस (शनिवारी बंद) धावेल. हाजीपुर, मुझफ्फरपूर, बापूधाम मोतिहारी, सगौली, बेतिया, नरकटियागंज, बगहा आणि कप्तानगंज येथे थांबेल. सकाळी ५.४० वाजता गोरखपूरहून निघून दुपारी १२.४५ वाजता पाटलीपुत्रला पोहोचेल. तर दुपारी ३.३० वाजता पाटलीपुत्रहून निघून रात्री १०.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. ही वंदे भारत एक्सप्रेस आठ डब्ब्याची आहे. चेयरकारचे तिकीट ७३६ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे १५३४ रुपये आहे. (PM Modi launches 10th Vande Bharat train in Bihar: full route explained )

Vande Bharat Express
Pune-Nagpur Express : ना वंदे भारत, ना तेजस, नागपूरहून पुण्यासाठी धावणार नवी सुपरफास्ट ट्रेन, वेळापत्रक काय?

पाटलीपुत्र (पटना) ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील प्रवास अधिक जलद होणार आहे. दोन राज्यांमधील पर्यटन, शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय सुविधांना यामुळे चालना मिळेल. IRCTC च्या वेबसाइटवरून तिकिटांचे बुकिंग करता येईल. ही ट्रेन बिहारमधील 10वी वंदे भारत एक्सप्रेस आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat : कोल्हापूर - मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत धावणार

पाटलीपुत्र-गोरखपूर वंदे भारत एक्सप्रेसचे थांबे खालीलप्रमाणे आहेत:

हाजीपुर, मुझफ्फरपूर,बापूधाम मोतिहारी, सगौली, बेतिया, नरकटियागंज, बगहा, कप्तानगंज

तिकिटाचे दर खालीलप्रमाणे आहेत:

चेयरकार: 736 रुपये

एक्झिक्युटिव्ह क्लास: 1,534 रुपये

Vande Bharat Express
Accident : पुलाचे कठडे तोडून कार नदीत कोसळली; ५ जणांचा दुदैवी अंत

बिहारमधून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची यादी -

पाटलीपुत्र-गोरखपूर (20 जून 2025 रोजी उद्घाटन)

पटना-हावडा

पटना-रांची

पटना-लखनऊ (गोमतीनगर)

भागलपूर-हावडा

न्यू जलपायगुडी-पटना

गया-हावडा

देवघर-वाराणसी

पटना-न्यू जलपायगुडी

पटना-आनंद विहार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com