
Thane MHADA Home Price : ठाण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. म्हाडा (महाराष्ट्र हाऊसिंग अॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी) ठाण्यात २० लाख रूपयांच्या आत घर मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) प्रथानमंत्री आवास योजना (PMAY-Urban) अंतर्गत घरांच्या किमती ठरवल्या जाणार आहेत. शिरगाव आणि खोनी भागात असणाऱ्या ६२४८ घरांच्या किमतीमध्ये बदल करण्यात आला आहे. First Come First Serve या अंतर्गत ठाण्यामध्ये म्हाडा कोकण बोर्ड ६२४८ घरांची विक्री करणार आहे. (MHADA First Come First Serve housing in Shirgaon and Khoni)
ठाण्यातील शिरगांव येथील म्हाडाच्या ५२३६ घरांच्या सुधारित किंमतीला मान्यता दिली आहे. घराच्या किमत १९ लाख २८ हजार रूपयांमध्ये घर मिळणार आहे. खोणी येथे १.१२ घरांच्या किंमतीमध्ये १ लाख रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आता येथील म्हाडाचे घर १९ लाख ११ हजार रूपयांना घर मिळेल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (आयएएस) यांनी सांगितले. (How to apply for MHADA Thane 2025 housing scheme)
ठाण्यामध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असेल, असे म्हाडा कोकण बोर्डाच्या अधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले. या योजनेसाठी कोणतीही डेडलाईन नाही, सर्व घरांची विक्री होईपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
प्रत्येकाचं घराचे स्वप्न पूर्ण व्हावं. गरीब आणि मध्यमवर्गीय असणाऱ्यांना फायदा व्हावा, हा म्हाडाचा मुख्य उद्देश आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. म्हाडाच्या नियमांनुसार, EWS कॅटेगरीमधील लोकांना या घराचा लाभ घेता येऊ शकतो. ६ लाख ते ९ लाख रूपयांच्या घरात कमावणारा प्रत्येकजण LIG श्रेणी अंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतो. ९ लाख ते १२ लाख रूपयांचे वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण एमआयजी अंतर्गत अर्ज करू शकतो. तर १२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण HIG साठी अर्ज करू शकतो.
घरांच्या किंमती कमी करण्यासोबतच म्हाडाने आणखी एक खुशखबर दिली. मुंबईमध्ये यंदाच्या दिवाळीत पाच हजार घरांची लॉटरी निघणार आहे. म्हाडाच्या अधिकारी संजीव जायस्वाल यांनी एप्रिलमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या भागात पाच हजार घरांची लॉटरी निघणार असून तयारी अंतिम टप्प्यात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.