
ओरफिश तुम्ही पाहिलाय का? ओरफिश दिसला तर महाप्रलय, भूकंप येतो असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. पण, खरंच हा मासा इतका भयंकर आहे का? त्याला प्रलयाची चाहूल लागते का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
ओरफिश दिसल्यावर मोठा महाप्रलय.भूकंप येतो असा दावा करण्यात आलाय. आणि हा आता ओऱफिश दिसल्याने देशावर मोठं संकट येणार असा दावा करण्यात आलाय. .हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे खरंच ओरफिश हा इतका खतरनाक मासा आहे का? हा मासा दिसल्यामुळे जलप्रलय, भूकंप येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
याबाबत माशांवर रिसर्च करणाऱ्या एक्सपर्टकडूनच माहिती मिळू शकते.त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तत्ज्ञांची भेट घेतली आणि त्यांना हा मेसेज दाखवून ओरफिशबद्दल माहिती जाणून घेतली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
ओरफिश दिसल्यावर संकट येतं हा दावा चुकीचा
ओरफिश हा खोल समुद्रात आढळतो
समुद्रातील अंतर्गत हालचालींची चाहूल लागते
आजारी पडल्यावर ओरफिश समुद्र किनारी दिसतो
वरती आल्यावर कमी दाबामुळे ओरफिशचा मृत्यू होतो
ओरफिश हा खोल समुद्रात राहत असल्याने तो सहसा दिसत नाही...जपानला त्सुनामी आली त्यावेळी हा मासा किनाऱ्यावर दिसला होता...समुद्रातील अंतर्गत बदल जाणवल्याने मासा वरती येतो. याला अंधश्रद्धेची जोडणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत ओरफिश दिसल्याने महाप्रलय, भूकंप येणार असल्याचा दावा असत्य ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.