Girl Dancing in Train: भोजपुरी गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, रेल्वे पोलीस करणार कारवाई; समोर आला Viral Video

Mumbai Local Train Viral Video: एका तरुणीने मुंबई लोकलच्या डब्यात अश्लील नृत्य करून रिल्स बनवून सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल केला.
Girl Dancing in Train
Girl Dancing in TrainSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Girl Dancing in Train Viral Video:

सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणीं प्रयत्न करत असतात. अशाच एका तरुणीने मुंबई लोकलच्या डब्यात अश्लील नृत्य करून रिल्स बनवून सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल केला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. मात्र यामुळे आता त्या तरुणीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वायरल व्हिडिओमध्ये भोजपुरी गाण्यावर तरुणी अश्लील नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे.

महिलांच्या डब्यात डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता अश्लील नृत्य करण्याचं हे फॅड दिवसेंदिवस वाढू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girl Dancing in Train
Mumbai Railway Stations: मुंबईतील 20 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, कोणत्या स्टेशनचा आहे समावेश? पाहा लिस्ट

सोशल माध्यमांमध्ये चमकण्यासाठी हल्ली तरुण-तरुणी हे विविध मार्गांचा अवलंब करत असतात अनेकदा धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करणे किंवा लोकलमध्ये डान्स करणे यासारखे मार्ग देखील अवलंबले गेले. मात्र मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात आज एका तरुणीकडून भोजपुरी गाण्यावर अश्लील नृत्य करत व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ महिला डब्यात बनवला जात असताना अनेक महिलांकडून त्या तरुणीला समजावण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र ती तरुणी आणि तिची सहकारी मैत्रीण यांनी महिलांकडे दुर्लक्ष करून तो अश्लील नृत्याचा व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियामध्ये वायरल केला.  (Latest Marathi News)

व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती तरुणी संया मारे सटा सट या भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभाव करुन डान्स करताना दिसून येत आहे. महिलांच्या डब्यात डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे तर.दुसरीकडे या व्हायरल पोस्टवर नेटकरी भन्नाट मिम्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Girl Dancing in Train
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील हा बोगदा वाहतुकीसाठी खुला, कोणत्या वाहनांना असणार परवानगी? जाणून घ्या

व्हिडिओ सोशल माध्यमातून वायरल झाल्यानंतर नेटकऱ्याने हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करुन मुंबई पोलीस, पश्चिम रेल्वेला टॅग केलं आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत त्या पोस्टला रिप्लाय दिला आणि संबंधित प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com