Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील हा बोगदा वाहतुकीसाठी खुला, कोणत्या वाहनांना असणार परवानगी? जाणून घ्या

Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास आता वेगवान होणार आहे. या मार्गावरील कशेडी बोगदा आजपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwaySaam Digital
Published On

Mumbai Goa Highway

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास आता वेगवान होणार आहे. या मार्गावरील कशेडी बोगदा आजपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते.

कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करता येणार नाही. दोन दिवसांपासून या बोगद्यातून चाचणी घेण्यात आली अखेर मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ही कशेडी बोगद्यातून सुरू करण्यात आली आहे. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून या बोगद्यातून प्रवास करताना वाहनांसाठी वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रति तास एवढी असणार आहे.

कोकणातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातील काम या वर्षाच्या २०२३ अखेरपर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होत. इतकेच नव्हे तर या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जूनमध्ये या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार होती. मात्र आता या कामाला फेब्रुवारी महिना उजाडला आहे. तीही एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Goa Highway
MHADA Lottery 2024 : म्हाडाची ५३११ घरे कोणाला मिळणार? आज लॉटरीची सोडत; कोणत्या योजनेंतर्गत किती घरे? जाणून घ्या

बोगद्याचे काम जवळपास आता अंतिम टप्प्यात आले आहे. या बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी आता अवघड वळणांच्या कशेडी घाटातून जवळपास २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच अवजड वाहनांसाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात पण या सगळ्याला आता उत्तम पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे.

Mumbai Goa Highway
BMC Hospital : मुंबईतील हॉस्पिटलमध्येही होणार वीजनिर्मिती; कसं ते जाणून घ्या?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com