BMC Hospital : मुंबईतील हॉस्पिटलमध्येही होणार वीजनिर्मिती; कसं ते जाणून घ्या?

BMC Hospital News : मुंबई महापालिका रुग्णालयांच्या स्वयंपाकगृहातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यातून बायोगॅस तयार केला जाणार आहे. या बायोगॅसने दररोज १७० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे केईएम, सायन, नायर, राजावाडी आणि शिवडी टीबी रुग्णालयांचा परिसर रात्रभर उजळून निघेल.
BMC Hospital
BMC Hospital Saam Digital
Published On

BMC Hospital

मुंबई महापालिका रुग्णालयांच्या स्वयंपाकगृहातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यातून बायोगॅस तयार केला जाणार आहे. या बायोगॅसने दररोज १७० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे केईएम, सायन, नायर, राजावाडी आणि शिवडी टीबी रुग्णालयांचा परिसर रात्रभर उजळून निघेल. बायोगॅस निर्मितीसाठी पालिका या रुग्णालयांमध्ये बायोमिथेनेशन प्लांट उभारणार आहे. या प्रकल्पासाठी नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

रुग्णालयांच्या स्वयंपाक घरांमधून दररोज हजारो किलो खराब झालेले अन्न, भाजीपाला आणि इतर जास्त ओला कचरा बाहेर पडतो. हा कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर जातो; परंतु येथील ओला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर न जाता त्यापासून तयार होणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. दररोज १७० युनिटपर्यंत वीज उपलब्ध होऊ शकते. या विजेचा वापर रुग्णालयाच्या आवारातील पथदिवे, कॅन्टीनमधील दिवाबत्ती आणि इतर कामांसाठी केला जाणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केईएम, सायन (लोकमान्य टिळक), नायर, राजावाडी आणि शिवडी येथील टीबी रुग्णालयांमध्ये पाच (प्रत्येकी एक) बायोमिथेनेशन प्लांट बसवले जातील. प्रत्येक प्लांटची क्षमता दोन मेट्रिक टन असेल. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत चार प्रस्ताव आले असून, याबाबत प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. पालिका रुग्णालयांमधील ओला कचरा शून्यावर आणण्याच्या दिशेने पालिकेने पाऊल उचलले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास महापालिका इतर रुग्णालयांमध्येही हा प्रकल्प राबवणार आहे.

BMC Hospital
Pune Accident News : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 9 वाहनं एकमेकांवर आदळली; जाणून घ्या महामार्गावरील वाहतूकीची स्थिती

प्रत्येक प्लांटची क्षमता दोन मेट्रिक टन

बायोगॅसमधून दररोज १७० युनिट वीज

प्रकल्पाची अपेक्षित किंमत ९ कोटी रुपये

येथे लावले जाणार प्लांट

देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येथे दररोज एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची योजना आहे. याशिवाय अन्न कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या विजेवर इलेक्ट्रिक वाहने चार्ज केली जात आहेत. हाजीअलीजवळ देशातील हे अशा प्रकारचे पहिले चार्जिंग स्टेशन असेल.

BMC Hospital
Pune Breaking News: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पाणी कपातीचे संकट टळले; शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडण्याचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com