Mumbai Railway Stations: मुंबईतील 20 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, कोणत्या स्टेशनचा आहे समावेश? पाहा लिस्ट

Indian Railways: एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार आहे. भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील १३०९ स्थानकांचे काम केले जाणार आहे.
CSMT Railway Station
CSMT Railway Stationsaam tv
Published On

>> सुरज मसुरकर

Mumbai Railway Stations Redevelopment:

एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार आहे. भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील १३०९ स्थानकांचे काम केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील ५५४ हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे तसेच १५०० रोड ओव्हर ब्रीज व भुयारी मार्गाचे २६ फेब्रुवारी उद्घाटन करणार आहेत. 4886 कोटींपेक्षा जास्त खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यातच मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 11 स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्‍वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांची पायाभरणी करण्याकरिता 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CSMT Railway Station
Maharashtra Politics: 'नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला पराभूत केलं, याचं दु:ख', केसरकर असं का म्हणाले?

मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचा होणार कायापालट

या 12 स्थानकांमध्ये सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी या स्थानकांच्या समावेश आहे (Byculla, Chinchpokli, Matunga, Kurla, Vidyavihar, Mumbra, Diva, Shahad, Titwala, Wadala Road, Igatpuri). यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाला 260 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या बारा स्थानकांमध्ये सर्वात जास्त निधी हा दिवा रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासासाठी देण्यात आला आहे. तर तब्बल 45 कोटी रुपये दिवा रेल्वे स्थानकाच्या कामासाठी देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

233 कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

पश्चिम रेल्वेतील आठ स्थानकांपैकी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणासाठी 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मलाड रेल्वे स्थानकाच्या पुनर्व विकासासाठी 35 रुपये कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 30 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. मरीन लाईन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये देण्यात आला आहे.

CSMT Railway Station
VBA Letter To MVA: '2 दिवसांत जागावाटपाचा निर्णय घ्या, नाही तर आम्हाला निर्णय घेणं सोपं होईल', वंचितचे मविआला पत्र

ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये, चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 23 कोटी रुपये, प्रभादेवीसाठी 21 कोटी आणि पालघर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि पुनर्बांधणीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असे मिळून एकूण 233 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात पश्चिम रेल्वेतील 8 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 स्थानकांचा पुनर्विकास होणार

मिळालेल्या माहितीनुसार, मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकांवर बारा मीटर रुंद पायी ओव्हर ब्रिजसाठी तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी 85.23 कोटी इतका खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. याचा खर्चदेखील 233 कोटी रुपयांमध्ये समाविष्ट आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरील 12 असे मिळून मुंबईतील एकूण 20 स्थानकांच्या पुनर्विकास होणार आहे. या कामांमध्ये सुधारित टॉयलेट बॉक्स आणि ड्रेनेज सिस्टीम बसवणे, स्ट्रक्चरल दुरुस्ती आणि छतावरील पत्रांची दुरुस्ती करणे, तिकीट बुकिंग ऑफिस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था आणि पार्किंग क्षेत्र तयार करणे या कामांची तरतूद आहे. अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये १२ मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com