रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेची जागा केंद्रीय मंत्री नारायण राणे लढविणार, अशी चर्चा असताना एकेकाळचे कट्टर राजकीय वैरी व लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले दोन्ही उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दिपक केसरकर एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या जागेसाठी अनेक नाव चर्चेत असून त्यात नारायण राणे, दीपक केसरकर, किरण सामंत यांची नावेही चर्चेत होती. त्यासोबत ही जागा शिंदे गटाला दिली जाईल, अशा देखील चर्चा असताना आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यातच आज माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसकर म्हणाले की, ''विनायक राऊत यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी मदत केली आणि नारायण राणे यांच्या कोकणातल्या एका मोठ्या नेत्याला पराभूत केलं, याचं मला आज सुद्धा दुःख आहे. त्याची भरपाई म्हणून राणेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला तर, मला आनंद होईल.'' (Latest Marathi News)
ते म्हणाले की, विनायक राऊतांसारखे दोन वेळा खासदार होण्यापेक्षा राणे यांच्यासारखा फायटर या मतदारसंघातून निवडून गेला पाहिजे. मुख्यमंत्री असताना त्यांनी काय कायापालट केला हे लोकांनी पाहील आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्यासमोर राणे उतरतील तेव्हा त्यांना प्रचाराला सुद्धा जायला लागणार नाही. अशा शब्दात केसरकर यांनी विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या उमेदवारीवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिल आहे.
केसरकर म्हणाले आहेत की, ''नारायण राणे जर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लोकसभेचे उमेदवार असतील तर, किरण सामंत यांचा विरोध असण्याचे कारण नाही. ही सीट शिवसेनेची आहे, म्हणून किरण सामंत इच्छूक आहेत. राणे जर उमेदवार नसतील तर 100 टक्के आम्ही किरण सामंत यांच्यासाठी सीट मागणार. मात्र उमेदवार कोणी असला तरी विनायक राऊत यांचा पराभव करणार.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.