UP Police Exam Cancelled: उत्तर प्रदेशात पोलीस भरतीचा पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर परीक्षा करण्यात आली रद्द

UP News: उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली पोलीस भरती परीक्षा रद्द केली आहे.
UP Police Exam Cancelled
UP Police Exam CancelledSaam Tv

UP Police Exam Cancelled:

उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली पोलीस भरती परीक्षा रद्द केली आहे. आता सहा महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 11 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पुनरावलोकन अधिकारी/सहायक पुनरावलोकन अधिकारी (प्राथमिक) परीक्षा-2023 संबंधित तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णयही घेतला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी हा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी तरूणांच्या मेहनतीशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

UP Police Exam Cancelled
Nanded News: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला 'दे धक्का'; ५५ नगरसेवकांनी ठोकला पक्षाला रामराम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''परीक्षेच्या पावित्र्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. तरुणांच्या मेहनतीशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. अशा बेशिस्त घटकांवर कठोर कारवाई केली जाईल हे निश्चित आहे.'' एका अधिकृत निवेदनानुसार मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार गृह विभागाने परीक्षा रद्द करण्याचे आदेशही जारी केले आहेत.  (Latest Marathi News)

सहा महिन्यांत पुन्हा होणार परीक्षा

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पोलीस भरती परीक्षेसंदर्भात प्राप्त माहितीच्या आधारे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने भरती मंडळाला कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा दाखविणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

UP Police Exam Cancelled
MLA Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; ती वस्तू डीएनए चाचणीसाठी पाठवली डेहराडूनला

उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सकडून (एसटीएफ) या प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, दोषी आढळणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांत परीक्षा पुन्हा घेण्याच्या आणि उमेदवारांना उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या सेवा मोफत देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com