MLA Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; ती वस्तू डीएनए चाचणीसाठी पाठवली डेहराडूनला

MLA Sanjay Gaikwad News : आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान वनविभागाने आमदार गायकवाड यांचे बयाण नोंदविले असून जप्त केलेला गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSaam Digital
Published On

MLA Sanjay Gaikwad

आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. शिवजयंती दिवशी मी वाघाची शिकार केली असं म्हणत गळ्यातील दात हा वाघाचा असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. दरम्यान वनविभागाने आमदार गायकवाड यांचे बयाण नोंदविले असून जप्त केलेला गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या तपासात वाघाचाच दात असल्याचं निष्पण झालं तर गायकवाड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंती दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे बयाण नोंदविले आहे. शिवाय आमदारांच्या गळ्यातील ती दात सदृश्य वस्तू सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केलेय. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाघदात सदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून, डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा वन विभागाने दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MLA Sanjay Gaikwad
Nagpur Firing Case : राज्यात चाललंय काय? नागपुरात दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या

बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी १९ फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून, १९८७ मध्ये त्याची शिकार केल्याचं वक्तव्य केलं होतं. तो वीडियो सध्या व्हायरल ही होत आहे. यासंदर्भाने प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचे एक बयाण घेतल्याची माहिती वन विभागाने दिलीय. आता यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर हा दात वाघाचा असल्याच निष्पण झालं तर यामध्ये तीन वर्षांची शिक्षा सुद्धा होऊ शकते.

MLA Sanjay Gaikwad
Eknath Shinde Meets Udayanraje Bhosale : मुख्यमंत्री म्हणाले, उदयनराजेंच्या साक्षीने सांगताे... (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com