Eknath Shinde Meets Udayanraje Bhosale : मुख्यमंत्री म्हणाले, उदयनराजेंच्या साक्षीने सांगताे... (पाहा व्हिडिओ)

Maratha Reservation : जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज राज्यभरात मराठा बांधव रास्ता रोको आंदोलन करीत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले.
cm eknath shinde visits tuljabhavani mandir in satara along with mp udayanraje bhosale
cm eknath shinde visits tuljabhavani mandir in satara along with mp udayanraje bhosale saam tv

Maratha Reservation :

मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही असे सातत्याने बाेलले जात आहे. परंतु त्याची कारणं काेणी सांगत नाहीत. ते टिकावे यासाठी सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. त्यावेळी ज्यांना संधी हाेती तेव्हा त्यांनी त्याचे साेनं केले नाही. आम्ही काेणत्याही समाजावर अन्याय हाेणार नाही याची दखल घेऊन मराठा आरक्षण दिले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी सातारा येथे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार उदयनराजे भाेसले यांच्या वाढदिवसानिमित्त (udayanraje bhosale birthday today) राजेंना शुभेच्छा देण्यासाठी आज (शनिवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस (jalmandir palace) येथे आले हाेते. त्यांच्या समवेत पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे आदी हाेते.

cm eknath shinde visits tuljabhavani mandir in satara along with mp udayanraje bhosale
Satara BJP : भांड्याला भांड लागत असलं तरी शेवट गाेड हाेईल, गाेरे-उदयनराजेंच्या उपस्थितीत धनंजय महाडिकांना विश्वास

सगेसोयरे या शब्दाला ग्राह्य धरूनच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवालीत पुन्हा उपोषण सुरू केले. जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज राज्यभरात मराठा बांधव रास्ता रोको आंदोलन करीत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार उदयनराजे भाेसले हे अग्रभागी हाेती. आम्ही विशेष अधिवेनश घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले.

काही लाेक म्हणतात दिलेले आरक्षण टिकणार नाही. परंतु ते टिकावे यासाठी सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. त्यावेळी ज्यांना संधी हाेती तेव्हा त्यांनी त्याचे साेनं केले नाही. आम्ही काेणत्याही समाजावर अन्याय हाेणार नाही याची दखल घेऊन मराठा आरक्षण दिले आहे. (Maharashtra News)

मराठा समाजाने संयम बाळगावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले खासदार उदयनराजे भाेसले यांच्या साक्षीने सांगताे मराठा समाजाने जाे लढा उभा केला. त्या यशस्वीपणे या निर्णयाने पूर्ण झाला आहे. कायद्याची चाैकटीत मराठा आरक्षण टिकेल अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतला आहे. यापूढे मराठा समाजाने आंदाेलन न करता संयम बाळगावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

cm eknath shinde visits tuljabhavani mandir in satara along with mp udayanraje bhosale
Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी, शुक्रवारपासून 'ही' सुविधा हाेणार बंद, नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com