Viral Video: साडीला लटकवून खाली उतरवलं आणि...! 200 रूपयांच्या कपड्यांसाठी मुलाचा जीव घातला धोक्यात, पाहा Video

viral video raising child safety concerns: हरियाणातील फरीदाबादमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कपडे आणण्यासाठी महिलेने मुलाला साडीच्या मदतीने आठव्या मजल्यावरून खाली उतरवल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झालेत.
viral video raising child safety concerns
viral video raising child safety concernssaam tv
Published On

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. हरियाणातील फरीदाबाद शहरातील सेक्टर-82 मधील फ्लोरिडा सोसायटीत घडलेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

खिडकीतून खाली पडलेले कपडे परत आणण्यासाठी एका महिलेने आपल्या लहान मुलाला साडीच्या मदतीने आठव्या मजल्यावरून सातव्या मजल्याच्या बाल्कनीपर्यंत उतरवल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकारामुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकं काय घडलं हरियाणामध्ये?

माहितीनुसार, आठव्या मजल्यावर राहणारी महिला कपडे वाळत घालत होती. यावेळी चुकून तिच्याकडून काही कपडे सातव्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये पडले. कपडे परत आणण्यासाठी महिलेने आपल्या मुलाला साडीने बांधून खाली उतरवलं. मुलाने पडलेले कपडे गोळा केल्यानंतर त्याला त्याच साडीने वर खेचण्यात आल्याचं कॅमेरात कैद झालंय. हा संपूर्ण प्रसंग समोरच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी शूट केलाय.

viral video raising child safety concerns
Delhi Couple Viral Video: प्रेम की अश्लील चाळे, धावत्या वाहनात जोडप्याने मर्यादा ओलांडल्या, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

सोशल मीडियावर संताप

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी या कृत्यावर संताप व्यक्त केला. अनेकांनी मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं म्हणत पालकांच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केलेत. सोशल मीडियावर एका युजरने म्हटलंय की, 'जर साडी मध्येच फाटली असती किंवा मुलाने घाबरून हात सोडला असता, तर गंभीर अपघात घडू शकला असता'. तर काही युजर्सने हा प्रकार अत्यंत निष्काळजीपणाचा असल्याचं म्हटलंय.

viral video raising child safety concerns
Shocking Accident : लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अपघात, प्रसिद्ध गायिकेचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, उंचावरुन खाली पडणार इतक्यात...

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर स्थानिक अपार्टमेंट असोसिएशन आणि पोलिसांनीही याची दखल घेतली. या संबंधित महिलेवर नोटीस बजावण्यात आली असून अशा प्रकारची कृती पुन्हा न करण्याचा इशारा देण्यात आल्याचं समोर आलंय.

viral video raising child safety concerns
Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com