Viral Video
Delhi Couple Viral VideoSaam Tv

Delhi Couple Viral Video: प्रेम की अश्लील चाळे, धावत्या वाहनात जोडप्याने मर्यादा ओलांडल्या, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका संतापजनक घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही संताप व्यक्त कराल. मात्र व्हायरल व्हिडिओत नेमके काय आहे ते एकदा पाहाच.
Published on

Delhi Shocking Video: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. एका जोडप्याने भररस्त्यावर आणि तेही धावत्या वाहनावर अश्लील कृत्य करत समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्ली(Delhi) शहरातील मध्यवर्ती भागातील दिसत आहे. शहरातील मुख्य रस्ता असल्याने मोठ्या संख्येने वाहन आहेत. दरम्यान त्याच रस्त्यावरुन जात असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार कैद केला ज्यात एक कपल रस्त्यावरुन जात असलेल्या वाहनावर उभं राहून अश्लील कृत्य करत असल्याचे दिसते.

घडलेल्या या प्रकारामुळे समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर याआधी दिल्लीतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात मेट्रोत कपल्सचे अश्लील कृत्य तर दिल्ली मेट्रोतील प्रवाशांची हाणामारी. मात्र, हा प्रकार भररस्त्यात घडल्याने सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सध्या हा व्हिडिओ(Video) delhi___say या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानतंर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''पोलिसांनी चांगलेच फटके दिले पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''किती तो संतापजनक प्रकार आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Couple Viral Video: नवरीला घास भरवणं पडलं महागात; घास भरावयला गेला अन् स्वत: च मार खाल्ला, पहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com