
Video : अमेरिकन पॉप स्टार केटी पेरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केटी पेरी लाईव्ह शोमध्ये फुलपाखरासारख्या आकाराच्या एका प्रॉपवर बसून परफॉर्म करताना, गाणं म्हणताना दिसते. पण अचानक प्रॉप झटका देऊन खाली येतो. काही सेकंदांसाठी केटी पेरी खाली पडणार असे वाटते. पण सुदैवाने तसं काही घडत नाही. व्हिडीओमध्ये केटी पेरी खाली पडण्यापासून थोडक्यात बचावल्याचे पाहायला मिळते.
केटी पेरीचा व्हायरल व्हिडीओ सॅन फ्रान्सिस्को शहरातील असल्याचे म्हटले जात आहे. लाईफटाईम्स टूर परफॉर्मन्सदरम्यान ही घटना घडली आहे. केटी पेरी 'रोअर' या गाण्यावर परफॉर्म करत होती. फुलपाखराप्रमाणे दिसणाऱ्या एका प्रॉपवर ती बसली होती. अचानक प्रॉप ज्या रशीला जोडलेले होते, त्याला झटका बसतो. प्रॉप एका बाजूला झुकते आणि केटी पेरी तिच्या सीटवरुन घसरते. सुदैवाने ती प्रॉपवरुन घसरुन खाली पडत नाही.
या झटक्यानंतर केटी पेरीच्या चेहऱ्यावर भीती दिसते. खाली असलेले तिचे चाहते देखील घाबरुन जातात. पण काही सेकंदांनी केटी पेरी स्वत:ला सावरते आणि टीमला मी ठीक आहे, घाबरु नका असा संकेत देत पुन्हा परफॉर्म करायला सुरुवात करते. सॅन फ्रान्सिस्कोमधील केटी पेरीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक यूजर्संनी 'सेलिब्रिटी लोक असे जीवघेणे स्टंट का करतात?' असे म्हटले आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी एका लाईव्ह परफॉर्मन्समध्ये बियोन्सेला देखील अशा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला होता. केटी पेरीप्रमाणे बियोन्सेदेखील अपघातातून बचावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.