
Shocking Incident Video: लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. लहानपणापासूनच प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाचा दिवस कसा असावा यापासून ते अशा असंख्य गोष्टींचे स्वप्न रंगवत असते. मात्र, कधी कधी नियोजन कितीही चोख असले तरी नियती काही वेगळेच ठरवते आणि आनंदाचे खास क्षण अनपेक्षित घटनांमुळे कटू अनुभवांमध्ये बदलते.
सध्या असाच काहीसा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे. एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नात(Wedding) फोटोशूटसाठी एका आकर्षक गोष्टी निवड केली. मात्र, त्या गोष्टीने नवरीला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आणली. ज्यात त्यांनी फोटो खास येण्यासाठी रंगीबेरंगी धूर बॉम्ब आणि फटाके वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र फोटोशूट करत असताना अचानक रंगीबेरंगी धूर बॉम्ब जोरदार फुटला आणि त्यात नवरीला गंभीर जखम झाली. सर्व धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.
लग्नातील घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूजर्संनी लिहिले आहे,''सध्या या घटना वाढत आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पारंपारिक लग्न केलेले बरे'' तर तिसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''सध्याच्या तरुणाईला थाटा-माटात लग्न करण्याची सवय लागली आहे'' तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक लग्नात असे अनेक नवीन ट्रेंड पाहण्यासाठी मिळत आहेत. मात्र, सध्या हा व्हिडिओ(Video) ''viaparadise'' या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला असून दोन दिवसांपूर्वी घटना घडली असल्याचे समजत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत.
टीप: लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.